Posts

Showing posts from May, 2025

मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक सपन्न...

Image
मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक सपन्न...      प्रतिनिधी/ शिरपूर                  मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक आज संपन्न करण्यात आली.  आढावा बैठकीत मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार यांच्या अध्यक्षते त घेण्यात आली. या वेळी प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक उपस्थिती  सभेचे प्रास्ताविक बी व्ही गिरासे यांनी केले. मानव विकास पत्रकार संघ १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी च्या गुण गौरव, उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक क्षेत्रात समाज सेवा करनारे समाज सेवक, राजकीय क्षेत्रात कामकरणारे नगरसेवक, जिप, पंचायत समिति सदस्य, यांना पुरस्कार देवून सत्कार व गुण गौरव करण्यात येईल असे डॉ प्रदीप पवार म्हणाले, त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.आज पत्रकारिता करणे फारच अवघड झाले आहे, परंतु सत्या साठी न डगमगता धाडसाने आपले काम करुन गरीबांना न्याय मिळवून देनारांच खरा पत्रकार असतो, असे पवार म्हणाले या प्रसंगी नंदूरबार जिल्हा सचिव, संजय गुरव यांनी आपले विचार मांडले, बैठकीत  मानव विकास पत्रकार  संघाचे ...

सायगाव न्याहारखेडे रस्ता खड्ड्यात गेला वाहून.!वाहन धारकांना मोठा त्रास,सतत अपघातात वाढ.

Image
सायगाव न्याहारखेडे रस्ता खड्ड्यात गेला वाहून.! वाहन धारकांना मोठा त्रास,सतत अपघातात वाढ.                                    नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- मुख्य संपादक शांताराम झाल्टे  सायगाव न्याहारखेडा ता. येवला जिल्हा परिषद अंतर्गत असनारा रस्ता अनेक वेळा निवेदने दिले परंतु झोपलेल्या प्रशासन व. लोक प्रतिनिधी यांना याचा काहीच फरक पडत नाही शाळेत जाणारे विद्यार्थी हे सायकलवर जाता अस्ताना देखील या ठिकाणी मोठया प्रमाणे अपघात होत आहे तरी हा रस्ता संपूर्ण पणे मोठया प्रमाणे खड्ड्यात खचला आहे हा पूर्ण रस्ता खड्ड्यात साचलेल्या डबक्या चे पाणी अंगावर कायमस्वरूपी उडत आहे तर कधी ग्रामीण भागात खेड्यात जाऊन जि. प. अधिकारी पाहणी करणार अशी मागणी अति जोमाने होत आहे तरी खूप मोठया प्रमाणे पडलेल्या खड्ड्यात मातीचे घमेले सुध्दा कोणीच टाकत नाही.हाच ग्रामीण भागातील विकास म्हनायचा का....? हा मनमानी कारभार भ्रष्टाचार केव्हा बंद होणार, असा सवाल सर्व त्रस्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहे हा भयानक रस्ता एक महिन्य...

घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा;--धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन...।

Image
घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा;--धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन...। योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ.व्ही डी पाटील  धरणगाव/प्रतिनिधी --विकास पाटील  धरणगाव : सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही गरजू लाभार्थी घरापासून वंचित राहू नये व घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष जबाबदारीने पार पाडावे यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते डॉ. व्ही डी पाटील यांनी तालुका गटविकास अधिकारी श्री. पवार, व सहा.गटविकास अधिकारी श्री.वानखेडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, घरकुल सर्वेक्षण हे योजनेचा मुख्य उद्देश सफल करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे उपेक्षित घटकांना घर बांधता येते, आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल होतो. धरणगाव तालुक्यातील अनेक गरीब व उपेक्षित घटक आहेत. विशेषतः भिल्ल समूह घरकुलांपासून आजही वंचित व दुर्लक्षित आहेत, यांसह बेघर असलेल्या सर्वच परिवाराचे सर्वेक्षण होऊन घरकुल यादीमधे नावे समाविष्ट करण्यात यावी, व खऱ्या गरजूंना घरकुल मिळावे, अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर प्रसंगी तालुक्यात असंख्य भिल्ल कुटुंब तोकड्या...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – पहूर महसूल मंडळ.

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – पहूर महसूल मंडळ. दिनांक: २८ मे २०२५ | ठिकाण: चंदन मंगल कार्यालय, पहूर मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत दिनांक २८ मे २०२५ रोजी पहूर महसूल मंडळाचे समाधान शिबिर चंदन मंगल कार्यालय, पहूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा एकाच छताखाली लाभ मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये २५ विभागांचे एकूण ३८ स्टॉल्स उभारण्यात आले होते. विविध विभागांमार्फत ७०१ नागरिक व लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे प्रत्यक्ष लाभ देण्यात आला: • पी. एम. किसान लाभार्थी - Land Data Seeding: ७ लाभार्थी • तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सेवा: ८२ लाभ • पुरवठा शाखा लाभ: ५८ लाभ • सेतू केंद्रामार्फत दिलेले लाभ: ४५ लाभ • संजय गांधी योजना (DBT प्रक्रिया): ५०७ लाभ नागरिकांच्या समाधानाचा सूर: या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विभागाचे प्रमुख व संबंधित कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध होते, य...

एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान...।

Image
एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान...।  जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय दादा पवार किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर दादा पाटील जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्या तर्फे तालुक्यात व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले गाव एरंडोल शहर विखरण उमरदे खर्ची रवंजा खडके पद्मालय नाग धुली चुटकी आडगाव तळई मालखेडा विक्रम रोड भवानीनगर हनुमान नगर उत्तम नगर केवढी पुरा तसेच  याठिकाणी उपस्थित जळगाव जिल्हा किसान सेलचे जिल्हाप्रमुख ईश्वर दादा पाटील व एरंडोल तालुका अध्यक्ष अमित दादा पाटील व माजी नगरसेवक डॉक्टर सुरेश दादा पाटील व एरंडोल  तालुका किसान सेल अध्यक्ष राजेंद्र चौधरी व किशोर भाऊ पाटील खर्ची मुकुंद भाऊ ठाकूर विखरण दिनेश महाजन रिंगणगाव व मनोज पाटील रिंगणगाव व सुनील  मोरे खडक खुर्द प्रदीप  सोनवणे व शेख कलीम एरंडोल व दीपक पाटील मालखेडा शेख मुजमबिल कासोदा शेख शोएब कासोदा व जयराम पाटी...

जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायत येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद...

Image
जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायत येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद... मुख्य संपादक शांताराम झाल्टे  जामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांचे लाभार्थी यांच्यासाठी आधार व बँक तसेच पोस्ट खात्याच्या लिंकिंगसाठी तसेच आधार अपडेट करण्यासाठी विशेष डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिराचे आयोजन पहूर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. जामनेर तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होते. या अडचणीची दखल घेत उपसरपंच राजू जाधव यांनी तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्याशी संपर्क साधून पहूर येथेच शिबिर घेण्याची मागणी केली. त्यानुसार या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे, संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे, तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी केले. या शिबिराला माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन...

राजेंद्र रामदास चौधरी एरंडोल यांची तालुकाप्रमुख किसानसेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदी नियुक्ती.

Image
राजेंद्र रामदास चौधरी एरंडोल यांची तालुकाप्रमुख किसानसेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदी नियुक्ती. मुख्य संपादक शांताराम झाल्टे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील जी तटकरे साहेब जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी व अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल दादा पाटील च्या आदेशावरून व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय दादा पवार व  राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील सर व राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले यांच्या हस्ते राजेंद्र रामदास चौधरी यांना एरंडोल तालुकाप्रमुख किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.. उपस्थित डॉक्टर सेलचे जिल्हाप्रमुख महेश दादा पवार सर्व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.।

कसबापिंप्री वि.का.सोसायटी येथे चेअरमन पदी श्री.सुधाकर पाटील यांची निवड...

Image
कसबापिंप्री वि.का.सोसायटी येथे चेअरमन पदी श्री.सुधाकर पाटील यांची निवड... जन क्रांती लाईव्ह न्यूज शांताराम झाल्टे  फत्तेपूर :  येथून जवळच असलेल्या कसबापिंप्री येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन पदी असलेले स्व.धनराजभाऊ बदर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असल्याने त्यांच्या रिक्त जागेवर  नवनिर्वाचित चेअरमनपदी म्हणून श्री.सुधाकर बाबूराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.  या निवडी सोबतच एका रेकॉर्डची ऐतीहासीक नोंद घेण्यात आली कि, कसबापिंप्री वि. का. सोसायटीच्या निर्मिती पासून पहिल्यांदाच एम.ए, एम. कॉम, बी.पी.एड व सहकार क्षेत्रातील पतसंस्थेत मॅनेजर पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि संपूर्ण संचालकां मध्ये एकमेव निल असलेल्या व्यक्तीमत्वाची निवड  करण्यात आलेली असल्याने बेटी बचाओ, बेटी पढाओ संघटनेचे जिल्हा सदस्य श्री राजेंद्र किटे यांचे तर्फे नवनिर्वाचीत चेअरमन श्री सुधाकर पाटील यांचे आणि बिनविरोध निवडी साठी सहकार्य केलेल्या सर्व संचालक मंडळाचे, निवडणूक निर्णय अधिकारी, सचिव व कर्मचाऱ्यांचे  खूप खूप अभिनंदन व कौतूक करण्यात आलेले आहे...

जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ...

Image
जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ...  उपविभागीय अधिकारी जळगाव मा.विनय गोसावी सर  यांच्या हस्ते उद्घाटन.। मुख्य संपादक शांताराम झाल्टे  देवपिंपरी  ता जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटप शुभारंभ मा विनय गोसावी सर उपविभागीय अधिकारी जळगाव यांचे हस्ते करण्यात येऊन ऑनलाइन पासेस चे वितरण वाघूर नदीपात्रात करण्यात आले.ऑनलाइन ETP generate करून वाळू वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे…यावेळी उपस्थित तहसीलदार जामनेर,गटविकास अधिकारी जामनेर,ग्राम महसूल अधिकारी देव पिंपरी,ग्राम पंचायत अधिकारी देवपिंपरी,पोलीस पाटील देवपिंपरी व घरकुल लाभार्थी उपस्थित होते. लाभार्थी यांना वाटप केलेले एकूण ऑनलाइन पासेस-२०८

तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ येथे कर्तव्यावर असलेले(भांडारपाल)एन.एस.सोनवणे तिसरे अपत्य बाबत शासनाची दिशाभूल करून करताय डोळे झाक...

Image
तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ येथे कर्तव्यावर असलेले(भांडारपाल)एन.एस.सोनवणे तिसरे अपत्य बाबत शासनाची दिशाभूल करून करताय डोळे झाक... सोनवणे सोनवणे असल्यामुळे सोनवणे यांना वाचवण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना सोनवणेंचा?  अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार करूनही कोणती कारवाई नाही तिसरे अपत्य असणाऱ्या श्री सोनवणे ला घालताय पाठीशी निलंबनाची कारवाई करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी ,हेमकांत गायकवाड मुख्य संपादक शांताराम झाल्टे  दिनांक.२३/०४/२०२५ रोजी भारतीय रजिस्टर पोस्टद्वारे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक.०२ येथे कर्तव्यावर विराजमान असलेले भांडारपाल स्टोअरकीपर एनएस सोनवणे यांची चौकशी करून योग्य ती नियमोचित कारवाई करणे बाबत तक्रार अर्ज केला होता परंतु अद्याप पर्यंत २० ते २५ दिवसाचा कालावधी होण्यात आलेला असून तरी देखील अर्जाबाबत कोणतीही दखल व कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही नियमानुसार शासनाने दिलेल्या साधारण अर्जावर सात ते आठ दिवसावर कारवाई हो...

निवडणुकांचे रणकंदन: नव्या राजकारणाची चाहूल...

Image
निवडणुकांचे रणकंदन: नव्या राजकारणाची चाहूल... मुख्य संपादक शांताराम झाल्टे  महाराष्ट्रात गेली ३ ते ४ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या सगळीकडे प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. लोकशाही व्यवस्थेत ही एक चिंताजनक बाब होती. मात्र नुकत्याच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या निवडणुकांना गती येणार असून दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन सज्ज, पक्ष सज्ज, पण जनता सजग सर्वच राजकीय पक्ष आता हालचालींना गती देत आहेत. ठिकठिकाणी नेत्यांचे दौरे, स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका, आणि मतदारसंघ पातळीवर समीकरणं जोखण्याचं काम सुरू आहे. मात्र हे चित्र जुनं नाही, यामध्ये जे वेगळं आहे ते म्हणजे  जनता आता केवळ पाहणारी नसून विचार करणारी आहे. नवे मतदार, नवे उमेदवार आणि नव्या आशा आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर मतदान यंत्रणेत दाखल झाली आहे. ही पिढी शिक्षित आहे, माहितीपूर्ण आहे, आणि पारंपरिक राजकारणाच्या पलिकडे पाहते. त्यामुळे अनेक नवखे पण जाणकार उमेदवार नि...

जामनेर तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन संपन्न...।

Image
जामनेर तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन संपन्न...। लोकशाही दिन – जामनेर तालुका दिनांक: १९ मे २०२५ रोजी स्थळ: तहसील कार्यालय, जामनेर येथे आयोजित करण्यात आले होते. मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर तालुक्यात दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयात तालुका स्तरावरील लोकशाही दिन संपन्न झाला. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व मागण्यांचे निवारण स्थानिक पातळीवर तातडीने व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार दरमहा तिसऱ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी जामनेर तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित १५ अर्ज सादर केले. विभागनिहाय प्राप्त अर्जांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे: 1. महसूल विभाग – १० अर्ज 2. पंचायत समिती कार्यालय – २ अर्ज 3. पोलीस स्टेशन फत्तेपूर – १ अर्ज 4. भूमी अभिलेख कार्यालय – १ अर्ज 5. आपले सरकार सेवा केंद्र – १ अर्ज प्रत्येक तक्रारीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संक्षिप्त सुनावणी घेतली. अनेक तक्...

ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक...फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज/उत्कृष्ट कारवाई

Image
ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक... फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज/उत्कृष्ट कारवाई. जन क्रांती लाईव्ह न्यूज  फत्तेपूर, ता. जामनेर – अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे ...

बिलवाडी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू – चार लाखांची शासकीय मदत शासन निर्णयानुसार मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या दिली जाणार...।

Image
बिलवाडी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू – चार लाखांची शासकीय मदत शासन निर्णयानुसार मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या  दिली जाणार...।  जन क्रांती लाईव्ह न्यूज   बिलवाडी, तालुका जामनेर येथील श्रीमती हिराबाई गजानन पवार (वय ३५ वर्षे) यांचा दिनांक ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद असून संबंधित कुटुंबावर अचानक ओढवलेला हा आघात लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांनी देखील याची तत्काळ दखल घेतली असून, प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार मदत कार्य अधिक गतीने राबवले जात आहे. आज दिनांक १२ मे २०२५ रोजी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यात आली. या वेळी तहसीलदार जामनेर, पोलीस निरीक्षक पहूर, स्थानिक पदाधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी घटनेचा आढावा घेतला आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत श...

गोदावरी खोऱ्यातीलपाण्याचा उपयोग अजिंठा डोंगररांगातून उगमपावणा-या उत्तरवाहीनी नद्यांना व्हावा---श्री.अर्जुनभोई सर (मुंबई समाज भुषण सन्मानित)

Image
गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग अजिंठा डोंगररांगातून  उगमपावणा-या उत्तरवाहीनी नद्यांना व्हावा--- श्री.अर्जुनभोई  सर (मुंबई समाज भुषण सन्मानित)। जन क्रांती लाईव्ह न्यूज  मुंबई प्रतिनिधी:- कालच तापी मधून  उत्तर महाराष्ट्राची तृप्ती मेगा पुनर्भरण योजनेवर करार झाला, मागील काळात गुजरात राज्यासोबतचा नार व पार नद्यांच्या पाण्याचा उपयोग नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील तलावात साठवण करून त्याचा उपयोग सदर जिल्ह्यातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून केलेला करार आजही आठवणीत आहे. जलसंपदा विभागा अंतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक नाशिक येथे संपन्न होऊन २०२७ साली नियोजित असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा घेतला गेला आहे. आम्ही अपेक्षा करत आहोत की, गोदावरीखोऱ्यातील काही जलस्रोत हा अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या आणि उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये सोडल्यास त्याचा उपयोग या दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही.  अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या व उत्तरवाहीनी असलेल्...

कसबा पिंप्री येथील सना जलील शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर...।

Image
कसबा पिंप्री येथील सना शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर...। सामाजिक शिक्षणाच्या अभावातही मिळवले यश;   कसबा पिंप्री गावात आनंदाचे वातावरण व सत्कारांचा वर्षाव.  मुख्य संपादक शांताराम झाल्टे  जा मनेर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अद्यापही मुस्लिम समाज शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे. योग्य शैक्षणिक वातावरणाचा अभाव, तसेच शिक्षणा विषयीची अल्प गोडी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न अर्धवटच राहते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही कसबा पिंप्री सारख्या छोट्याशा गावातील सना जलील शेख हिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गावातीलच नव्हे, तर परिसरातील पहिली मुस्लिम महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. सनाच्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहिल्यास , तिचे प्राथमिक शिक्षण फत्तेपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत झाले. इकरा हायस्कूल, तोंडापूर येथे आठवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अकरावी व बारावीचे शिक्षण अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव येथे घेतले. त्यानंतर तिने नीट व सीईटी परीक्षेची तयारी करून सन २०१८ मध्ये इकरा युनानी मेडिकल कॉलेजमध्ये बी.यू.एम.एस. (बैचलर ऑफ य...

जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित...।

Image
जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित...। सत्कारावेळी सर्व पदाधिकारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, मंत्री गुलाबराव पाटील,खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जळगाव, दि. ८ मे जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इंगळे साहेब व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.हा गौरव सोहळा आज सकाळी जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे पार पाडणयात आला.  जिल्हा विकास समन्वय व दिशा समितीच्या 2024-25 या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात एकूण १३० अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध योजनांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  या प्रसंगी जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोकजी पालवे, स्थापत...

राज्यभरात जामनेर पंचायत समितीला घवघवीत यश...।

Image
राज्यभरात जामनेर पंचायत समितीला घवघवीत यश...। गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समितीला घवघवीत यश व दुहेरी पुरस्कार.। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर (जि. जळगाव) पंचायत राज संस्थांमधील उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात जामनेर पंचायत समितीने राज्यभरात आपला ठसा उमटवत दणदणीत यश संपादन केले आहे. वर्ष 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले आहेत.ग्रामविकास, प्रशासन व्यवस्थापन, नवोपक्रम, पारदर्शकता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेत ही निवड केली गेली. जामनेर पंचायत समितीने या सर्वच निकषांवर आपली ठसा उमटवत इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.या यशामागे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे कुशल नेतृत्व, समर्पित अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग या सर्व...

जामनेर पंचायत समिती सभागृह येथे कृषि विभागा मार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन ...।

Image
जामनेर पंचायत समिती सभागृह येथे कृषि विभागा मार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन ...। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर: आज पंचायत समिती सभागृह येथे कृषि विभाग,जामनेर यांचेमार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. श्री. संभाजी ठाकूर साहेब, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक हे उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कृषी विभागाची खरीप नियोजनाची रूपरेषा मांडली. या कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शक श्री.वैभव सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव यांनी उंच सरी व वरंबा (BBF) पद्धतीच्या पेरणी यंत्राने पेरणी केल्याने होणारे फायदे आणि उत्पादन वाढ याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री.अतुल पाटील, कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी तालुक्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीचे सूत्र शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सिजेंटा कंपनीचे श्री अमित लाहोरे साहेब यांनी मका पिकावरील उशिरा येणारा मर रोग याबाबत माहिती दिली.कृषी भूषण पुरस्कार प्राप...

अवकाऴी पावसामुळे हिवरखेडे बु.येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...।

Image
अवकाऴी पावसामुळे हिवरखेडे बु.येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर दिनांक ०६ मे २०२५ रोजी जामनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे मौजे हिवरखेडे बु. येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तात्काळ पाहणी करण्यासाठी श्री. विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी, जळगाव, तहसीलदार जामनेर, तालुका कृषी अधिकारी, जामनेर, तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर मा.प्रांताधिकारी,जळगाव यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जात असून, संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ...

Image
तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ.। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर (ता. जामनेर) - महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान आणि नियोजित होणार आहे. या प्रणाली अंतर्गत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी कार्यालयात लावलेल्या QR कोड स्कॅन करून, आपल्या भेटीचा उद्देश व आवश्यक तपशील भरायचा आहे. यामुळे भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात होणार असून, कामकाज अधिक सुकर व कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेट अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली शासनाच्या “गतीमान व पारदर्शक सेवा” या ध्येयाशी सुसंगत होणार आहे  जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे मार्गदर्शन...

QR code वाचनालयाचे मा साधनाताई गिरीश महाजन नगराध्यक्ष नगरपरिषद जामनेर यांचे शुभ हस्ते उद्घाटन...

Image
QR code वाचनालयाचे मा साधनाताई गिरीश महाजन नगराध्यक्ष नगरपरिषद जामनेर यांचे शुभ हस्ते उद्घाटन... जामनेर तहसील कार्यालयात १०० दिवस कार्यक्रमांतर्गत अभ्यागत कक्ष,आवक जावक कक्ष. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मा मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशानुसार सुरू असणाऱ्या १०० दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत दिलेल्या ७ कलमी कार्यक्रम अनुषंगाने आज जामनेर तहसील कार्यालयात अद्ययावत आवक जावक कक्ष व योजनादूत कक्ष तसेच अद्ययावत अभ्यागत कक्ष व त्या अंतर्गत असणारे QR code वाचनालयाचे उद्घाटन मा साधनाताई गिरीश महाजन माजी नगराध्यक्ष नगरपरिषद जामनेर यांचे शुभ हस्ते आज करण्यात आले. अद्ययावत अभ्यागत कक्ष यात ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था,  अभ्यागत कक्षातील QR code वाचनालय,योजनापर माहितीसाठीचा digital platform ,तसेच कार्यालयाचे आवारातील भिंतीवर जमीन व्यवहार निती अनुषंगाने गोष्टीरुप कायद्याचे माहिती फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत.गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रक देखील QR code स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आ...