जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायत येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद...
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
जामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यांचे लाभार्थी यांच्यासाठी आधार व बँक तसेच पोस्ट खात्याच्या लिंकिंगसाठी तसेच आधार अपडेट करण्यासाठी विशेष डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिराचे आयोजन पहूर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.
जामनेर तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होते. या अडचणीची दखल घेत उपसरपंच राजू जाधव यांनी तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्याशी संपर्क साधून पहूर येथेच शिबिर घेण्याची मागणी केली. त्यानुसार या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे, संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे, तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी केले.
या शिबिराला माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. वासुदेव घोंगडे, सरपंच श्री.अब्बू तडवी, माजी उपसरपंच श्री. रवींद्र मोरे, श्री. चेतन रोकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून श्री. सुहास कोटे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा नागरे, श्रीमती पल्लवी सोळुंके, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री.भूषण राजपूत, श्री. आनंदा शिंदे व श्री. विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांची आधार व बँक खात्याशी लिंकिंग, आधार अपडेट यासंबंधी मार्गदर्शन व प्रत्यक्ष सेवा दिली.
या शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे. गावकरी व लाभार्थ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत संयोजनकर्त्यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment