अवकाऴी पावसामुळे हिवरखेडे बु.येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...।
अवकाऴी पावसामुळे हिवरखेडे बु.येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...।मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर
दिनांक ०६ मे २०२५ रोजी जामनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे मौजे हिवरखेडे बु. येथे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तात्काळ पाहणी करण्यासाठी श्री. विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी, जळगाव, तहसीलदार जामनेर, तालुका कृषी अधिकारी, जामनेर, तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी करण्यात आली.
या पाहणीनंतर मा.प्रांताधिकारी,जळगाव यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जात असून, संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.