कसबा पिंप्री येथील सना जलील शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर...।


कसबा पिंप्री येथील सना शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर...।सामाजिक शिक्षणाच्या अभावातही मिळवले यश;  

कसबा पिंप्री गावात आनंदाचे वातावरण व सत्कारांचा वर्षाव.

 मुख्य संपादक शांताराम झाल्टे 

जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये अद्यापही मुस्लिम समाज शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे. योग्य शैक्षणिक वातावरणाचा अभाव, तसेच शिक्षणा विषयीची अल्प गोडी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न अर्धवटच राहते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही कसबा पिंप्री सारख्या छोट्याशा गावातील सना जलील शेख हिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गावातीलच नव्हे, तर परिसरातील पहिली मुस्लिम महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.सनाच्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहिल्यास, तिचे प्राथमिक शिक्षण फत्तेपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत झाले. इकरा हायस्कूल, तोंडापूर येथे आठवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अकरावी व बारावीचे शिक्षण अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव येथे घेतले. त्यानंतर तिने नीट व सीईटी परीक्षेची तयारी करून सन २०१८ मध्ये इकरा युनानी मेडिकल कॉलेजमध्ये बी.यू.एम.एस. (बैचलर ऑफ युनानी मेडिसिन अ‍ॅण्ड सर्जरी) साठी प्रवेश मिळवला.सन २०२५ मध्ये झालेल्या पदवीदान समारंभात तिला बी.यू.एम.एस. पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला तिचे आई-वडीलही उपस्थित होते.सना शेखच्या यशाचे कौतुक करत कसबा पिंप्री येथील मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक वृंद तसेच संपूर्ण गावकऱ्यांनी तिचा सत्कार करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सना शेखने दाखवलेल्या जिद्दीमुळे ग्रामीण व मुस्लिम समाजातील मुलींना प्रेरणा मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।