जामनेर तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन संपन्न...।

जामनेर तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन संपन्न...।
लोकशाही दिन – जामनेर तालुका
दिनांक: १९ मे २०२५ रोजी स्थळ: तहसील कार्यालय, जामनेर येथे आयोजित करण्यात आले होते.
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
जामनेर तालुक्यात दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयात तालुका स्तरावरील लोकशाही दिन संपन्न झाला. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व मागण्यांचे निवारण स्थानिक पातळीवर तातडीने व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार दरमहा तिसऱ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो.

यावेळी जामनेर तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित १५ अर्ज सादर केले. विभागनिहाय प्राप्त अर्जांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे:
1. महसूल विभाग – १० अर्ज
2. पंचायत समिती कार्यालय – २ अर्ज
3. पोलीस स्टेशन फत्तेपूर – १ अर्ज
4. भूमी अभिलेख कार्यालय – १ अर्ज
5. आपले सरकार सेवा केंद्र – १ अर्ज

प्रत्येक तक्रारीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संक्षिप्त सुनावणी घेतली. अनेक तक्रारींवर प्राथमिक स्वरूपात कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित तक्रारींच्या सोडवणुकीसाठी आवश्यक ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

फलनिष्पत्ती
लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी घेतली. यामुळे शासकीय यंत्रणेबाबत विश्वास निर्माण झाला असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. विविध विभागांनी समस्यांवर तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे उपक्रम यशस्वी ठरला.

मा जिल्हाधिकारी जळगाव ,यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडला. भविष्यातही या उपक्रमाला अधिक प्रतिसाद मिळावा व अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

“लोकशाही दिन – शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे दुवा!”

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।