कसबापिंप्री वि.का.सोसायटी येथे चेअरमन पदी श्री.सुधाकर पाटील यांची निवड...

कसबापिंप्री वि.का.सोसायटी येथे चेअरमन पदी श्री.सुधाकर पाटील यांची निवड...
जन क्रांती लाईव्ह न्यूज शांताराम झाल्टे 
फत्तेपूर :  येथून जवळच असलेल्या कसबापिंप्री येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन पदी असलेले स्व.धनराजभाऊ बदर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असल्याने त्यांच्या रिक्त जागेवर  नवनिर्वाचित चेअरमनपदी म्हणून श्री.सुधाकर बाबूराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.
 या निवडी सोबतच एका रेकॉर्डची ऐतीहासीक नोंद घेण्यात आली कि, कसबापिंप्री वि. का. सोसायटीच्या निर्मिती पासून पहिल्यांदाच एम.ए, एम. कॉम, बी.पी.एड व सहकार क्षेत्रातील पतसंस्थेत मॅनेजर पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि संपूर्ण संचालकां मध्ये एकमेव निल असलेल्या व्यक्तीमत्वाची निवड  करण्यात आलेली असल्याने बेटी बचाओ, बेटी पढाओ संघटनेचे जिल्हा सदस्य श्री राजेंद्र किटे यांचे तर्फे नवनिर्वाचीत चेअरमन श्री सुधाकर पाटील यांचे आणि बिनविरोध निवडी साठी सहकार्य केलेल्या सर्व संचालक मंडळाचे, निवडणूक निर्णय अधिकारी, सचिव व कर्मचाऱ्यांचे  खूप खूप अभिनंदन व कौतूक करण्यात आलेले आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।