Posts

Showing posts from August, 2025

नाचणखेडा परिसरातील मा.अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांनी अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची केली पाहणी..

Image
नाचणखेडा परिसरातील मा.अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांनी  अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची केली पाहणी.. जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी • मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात रक्षाबंधन, योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम...

Image
जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात रक्षाबंधन, योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  जामनेर तालुका | जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज मौजे गंगापुरी येथील शासकीय आदिवासी मुलांची शाळा येथे एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यात आली. या प्रसंगी धरती आबा योजना, जातीचे दाखले, विशेष सहाय्य योजना आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांनी केले. उपस्थितांना योजनांचा लाभ कसा मिळवायचा याबाबतही त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली. कार्यक्रमानिमित्त “एक पेड माँ के नाम” या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत आश्रमशाळा परिसरात वृक्षारोपण करून हरित संदेश देण्यात आला. यावेळी सरपंच गारखेडा बु, उपसरपंच, स्थानिक पदाधिकारी, आदिवासी बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शासकीय आश्रमशाळा गंगापुरीचे मुख्याध्यापक श्री. तायडे व शिक...

समतानगरमध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 15 ऑंगस्ट दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप ...

Image
समतानगरमध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 15 ऑंगस्ट दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप ... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  जळगाव (प्रतिनिधी) – येथील समतानगर परिसरात आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय आवश्यक साहित्याचे वाटप करून उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक संस्था आणि स्थानिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बॅग आदी साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पालक, शिक्षकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिक्षणातील सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेश बाऱ्हे, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू बाविस्कर, शहर संघटक भिमराव सोनवणे, राष्ट्रवादी महिला संघटक अध्यक्षा जयश्री महेंद्र बिऱ्हाडे, संघटक आदित्य महेंद्र बिऱ्हाडे, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे संघटक गुलाबराव भदाणे, लक्ष्य खान्देशचे संपादक संतोष पट्टीवाले, महाराष्ट्र भरारीचे संपादीका संगीता सागजकर, सा...

स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटने अंतर्गत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पत्र .

Image
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटने अंतर्गत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पत्र . जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर   स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटने अंतर्गत अधिकार व पत्रकार सरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष हे मागील काही दिवसा पासून मा. मुख्याधिकारी साहेब श्री. राजेंद्र फातले आणि जिल्हाधिकारी साहेब जळगाव याना भुसावळ नगर परिषद हद्दीतील सिंधी कॉलनी, नानक नगर, नवजीवन सोसायटी परिसरात असलेल्या म्यु. घ. न.यांची घरपट्टी असेसमेंट उताऱ्या वर नमूद क्षेत्रफळ आणि आज रोजी अस्तित्वात असलेले बांधिव क्षेत्राफळ यांची डाटा एन्ट्री नुसार तपासणी व्हावी आणि बांधकाम परवानगी तपासणी करावी बांधकाम परवानगी नुसार बांधकाम केले आहे किंवा नाही याची तपासणी व्हावी, तसेच सदर परिसरात अतिक्रमन आहे का असल्यास संबंधित विभागास कार्यवाही करण्याचे आदेश व्हावे, तसेच सदर परीसरात व्यापार करण्यासाठी नागरिकांनी दुकानें उभारलेली आहे त्या दुकानाची नोंद नगर परिषद तर्फे दफ्तरी घेण्यात येऊन व्यापारी दुकानें म्हणून कर वसुल करण्यात यावा, ...

नांदगाव तालुक्यातील अन्याय ग्रस्त उपोषणकर्त्या महिलेला न्याय देण्यासाठी भिमटोला सामाजिक संघटनेचा पाठिंबा...

Image
नांदगाव तालुक्यातील अन्याय ग्रस्त उपोषणकर्त्या महिलेला न्याय देण्यासाठी भिमटोला सामाजिक संघटनेचा पाठिंबा... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  नाशिक (प्रतिनिधी) दिनांक 14/8/2025 गुरुवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई गायकवाड यांनी विभागीय महसुल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असुन न्यायासाठी लढाई संविधानिक मार्गाने सुरु केली आहे. मौजे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी सौ.लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांच्या मालकीचे गट नंबर 310 ही शेतजमीन असून त्यांच्या मालकी हक्काचे दस्त व कागदपत्रे असतानाही तेथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक जमिनीत येण्यास मज्जाव करून जीवे ठार मारण्याची धमकी देतात यापूर्वी ह्या गावगुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलही आहे  ते पीडीतेला मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव करतात ह्या सर्व गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष द्यावे योग्य ती चौकशी करुन न्याय द्यावा  अशा मागण्यांसाठी नाशिक रोड  विभागीय महसूल आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण छेडले आहे  याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेने जाहिर पाठिंबा...

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्राण गु.ह.जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथील २०० विद्यार्थ्यांना मोफत अपघाती विमा कवचाचे संरक्षण...

Image
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्राण गु.ह.जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथील २०० विद्यार्थ्यांना मोफत अपघाती विमा कवचाचे संरक्षण... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  उत्राण गु.ह. (ता.एरंडोल)  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, उत्राण गु.ह.येथील २०० विद्यार्थ्यांना महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आले आहे. ही उपक्रमशैली जि.प.चे माजी उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर आमले यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन आणि संचालक विलास महाजन यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वाल्मीक ठाकरे होते. यावेळी माजी सरपंच राजेंद्र पाटील, माजी ...

सा.बां.विभागांच्या हलगर्जीपणा मुळे लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगत खड्डे .खड्ड्यामुळे जास्त प्रमाणात अपघात ...लोकशाही मराठी पत्रकार संघ व स्वाभिमानी सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा.!

Image
सा.बां.विभागांच्या हलगर्जीपणा मुळे लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगत खड्डे . खड्ड्यामुळे जास्त प्रमाणात अपघात .  लोकशाही मराठी पत्रकार संघ व  स्वाभिमानी सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा.! लासलगाव विशेष प्रतिनिधी:-  लासलगाव ता. निफाड लगत रेल्वे स्टेशन रोड च्या सर्व  रस्त्यावरील अपघाती झालेला धोकादायक सर्वत्र खड्ड्यांमुळे उघडे पडलेल्या अपघातला जाहीर आमंत्रण देणार्या गजच्या, सळ्या  काढून रस्ता मोकळा करताना लासलगाव चे, सामाजिक कार्यकर्ते संजय भालके . दिलीपराव पानगव्हाणे , बाजीराव  वाघ ,कुंदे पाटील व इतर सर्व त्रस्त झालेले नागरिक यावेळी उपस्थित होते, त्वरित खड्ड्यात सिमेंट टाकण्याचा निर्णय सा.बां.विभागाने घ्यावा अन्यथा दि.15 ऑगस्ट रोजी त्या खड्ड्यात भव्य वृक्षारोपण करून, जन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा, सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूदादा सादिकभाई मोमीन सोशल फाउंडेशन, व. लोकशाही मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या वतीन...

एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी– अट्टल घरफोड्या करणारा चोरटा गजाआड...

Image
एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी– अट्टल घरफोड्या करणारा चोरटा गजाआड... शुक्रवार, अगस्त 08, 2025 जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  जळगाव– एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नारायण मोटर्समध्ये दिनांक १६/०७/२०२५ ते १७/०७/२०२५ दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास दुकान नं. ४ मधून अंदाजे ₹१,६०,००० किमतीचे जुने व नवीन तांब्याच्या तारांची घरफोडी करण्यात आली होती.  या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.  एमआयडीसी पोलिस निरीक्षक बचन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने राहुल तायडे व सुमेथ पाटील या दोघांना अटक केली होती.  मात्र मुख्य आरोपी कृष्णा टक (रा. शिरसोली बुद्रुक) हा गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता.  दिनांक ०६/०८/२०२५ रोजी तो पुन्हा एमआयडीसी परिसरात दिसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडून दोन दिवसांपूर्वी चोरलेल्या अंदाजे ₹२५,००० किमतीच्या ५० किलो तांब्याच्या जुन्या व नव्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.महेश्व...

डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कामाची देश दखल घेईल —माजी खा .डॉ.उल्हास पाटील अनेक पदाधिकार्यांकडून वाढदिवसाच्या वतीने शुभेच्छा ंचा वर्षाव...

Image
 डॉ.केतकी पाटील यांच्या  वाढदिवसानिमीत्त कामाची देश दखल घेईल जाणार—माजी खा .डॉ.उल्हास पाटील  अनेक पदाधिकार्यांकडून वाढदिवसाच्या वतीने शुभेच्छा ंचा वर्षाव... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  जळगाव — सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत.त्यांच्या कार्याची देश दखल घेईल असा विश्वास माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी आज बोलून दाखवला.   गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी फाउंडेशन परिवाराने हा सोहळा  आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. केतकी पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छ...

डॉ.केतकीताईच्या रूपाने तरूण पिढी देशाचे भविष्य - डॉ. उल्हास पाटील

Image
 डॉ.केतकीताईच्या रूपाने तरूण पिढी देशाचे भविष्य - डॉ. उल्हास पाटील जन क्रांती लाईव्ह न्यूज  जळगाव - डॉ. केतकी पाटील हिचा जन्म झाला तेव्हा जळगावला आठ खाटांचे रूग्णालय होते. तिच्या पायगुणाने त्याचे ५० खाटात रूपांतर झाले आणि आता गोदावरी आईच्या नावाने हि हेल्थसिटी उभी राहिली आहे. वक्तशीरपणा, स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रम हे डॉ. केतकीताईमधील गुण असून तिच्या रूपातील तरूण पिढी हे देशाचे भविष्य असल्याचे मत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.  डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, हृदयविकार तज्ज्ञ ...

वरणगाव सुशीला राम कदम विदयालयात शिक्षक पालक संघाची सभा संपन्न.

Image
वरणगाव सुशीला राम कदम विदयालयात शिक्षक पालक संघाची सभा संपन्न. जन क्रांती लाईव्ह न्यूज  सुशीला राम कदम प्राथमिक विद्या मंदिर, वरणगाव येथे  दि.५/०८/२०२५ मंगळवार रोजी पालक शिक्षक सभा आनंदात संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष स्थानी  किरण पाटील सर हे होते . मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी मॅडम यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास कसा साधता येईल याबाबत मार्गदर्शनपर संभाषण सादर केले,पालक -शिक्षक - विद्यार्थी अडीअडचणीवर चर्चेबाबत हितगुज मध्ये  पालकांनी मुलांना वेळ द्यावा व  मुलांच्या  शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सौ . रेखा चौधरी मॅडम यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक वर्षापासून चे उपाध्यक्ष व सदस्य वर्ग निहाय निवड बिनविरोध झाली.उपाध्यक्ष पदी सौ भारती पाटील, पिंपळगाव खु यांची निवड करण्यात आली. सुत्रसंचलन श्री विजय झोपे सर यांनी केले,, आभार प्रदर्शन सौ रेखा चौधरी मैडम यांनी केले, सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ...

Image
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम  डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ... जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर  ्जळगाव - गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचा शनिवारी ९ रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी १० वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.  गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके हे होते. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा. डॉ. धनंजय बोरोले, प्रवीण कोल्हे, राहुल गिरी, चेतन चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक...

आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे...

Image
आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे... जन क्रांती लाईव्ह न्यूज  नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 6/8/2025 बुधवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.रोहितकुमार राजपूत यांची भेट घेऊन निवेदन दिले.. निवेदनाचा आशय असा आहे की आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद होण्यासाठी गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने रास्ता रोको निवेदने देऊनही अद्याप पर्यंत शासनाने दखल न घेतल्याने आज अंतिम इशारा निवेदन देऊन अवजड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे..! याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, प्रदेशाध्यक्ष विकीभाई भोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत (टिल्लूभाई) साळवे, युवा नेते विशालभाऊ वाघमारे, लक्ष्मीबाई गायकवाड, युवा नेते कुणालजी शर्मा, मयू...

जागतिक आदिवासी गौरव दिनाची यावलकर आदिवासी तडवी भिल समाज कार्यकारणी जाहीर .

Image
जागतिक आदिवासी गौरव दिनाची यावलकर आदिवासी तडवी भिल समाज कार्यकारणी जाहीर . जन क्रांती लाईव्ह न्यूज         यावलकर आदिवासी तडवी भिल समाज जागतिक आदिवासी गौरव दिन 9 ऑगस्ट यावर्षीही जल्लोषात साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात आलेली आहे.             आदिवासी बांधवांचा अस्मिता व गौरवाच्या समजला जाणारा जागतिक आदिवासी दिन देशभरात सांस्कृतिक प्रदर्शनासहित जल्लोषात साजरा केला जातो त्याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी जागतिक आदिवासी गौरव दिन आदिवासी तडवी भिल समाज बांधवांतर्फे जल्लोष साजरा केला जातो त्या अनुषंगाने यावलकर आदिवासी तडवी भिल समाजाची कार्यकारणी गठीत करण्यात आलेली आहे.    यावलकर जागतिक आदिवासी दिन सोहळा कार्यकारणी 2025 -                🌹💐💐🌹 1) अध्यक्ष - हुसेन जहांगीर तडवी  2) उपाध्यक्ष - राजेश रुबाब तडवी . 3)उपाध्यक्षा - सलमा महंमद तडवी  4) कार्याध्यक्ष - आरिफ सलिम तडवी. 4) सचिव - शाहिद ( मुन्ना ) हुसेन तडवी. 5) सहसचिव- शबाना नूरमहंमद तडवी ...

पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवर आजाराची लक्षणे लक्षात येताच शिक्षकांनी ताबडतोब रुग्णालयात केले दाखल...

Image
पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवर आजाराची लक्षणे लक्षात येताच शिक्षकांनी ताबडतोब रुग्णालयात केले दाखल... अतिदक्ष शिक्षकांची उत्कृष्ट कामगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपचाराकरिता विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला यश. जन क्रांती लाईव्ह न्यूज एरंडोल तालुक्यातील पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दि.२४जुलै२०२५रोजी गोवर सदृश्य आजाराची लागण झाल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच संदर्भित सर्व विद्यार्थ्यांना ग्रामिण रुग्णालय एरंडोल येथे आश्रमशाळेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी त्वरित दाखल केले.   वैद्यकीय पथकाने ताबडतोब उपचार सुरू करून गंभीर स्वरूपाची आजाराची लक्षणे दिसून येत असलेल्या काही विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. आज रोजी सर्व विद्यार्थ्यांची उपचाराअंती प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले असून नवीन गोवर सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची एकही नोंद झालेली नाही.असे दिसून आले आहे  कुठल्याही विद्यार्थ्यांना व्हॅंटीलिटरवर ठेवण्यात आले नाही. मा.जिल्हाधिकारी आयुष...

मार्टि कृती समितीच्या वतीने मा. अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे यांचा सत्कार व निवेदन सादरीकरण...

Image
मार्टि कृती समितीच्या वतीने मा. अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे यांचा सत्कार व निवेदन सादरीकरण... जन क्रांती लाईव्ह न्यूज  नविन पदभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मा. अल्पसंख्याक आयुक्त मा. प्रतिभा इंगळे महोदया यांचा मार्टि कृती समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार व शुभेच्छा देऊन "अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि)" विषयी विशेष चर्चा करण्यात आली. या प्रसंगी समितीतर्फे शासन स्तरावर निवेदन सादर करून, “मार्टि” ही संस्था कार्यान्वयनाच्या प्रक्रियेत असताना, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना महाज्योती व अमृत संस्थेमार्फत तात्पुरता योजनांचा लाभ एकसमान धोरणानुसार मिळावा, अशी विनंती करण्यात आली. या कार्यक्रमाला मार्टि कृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष अँड. अझर पठाण, उपाध्यक्ष सर आसिफ, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, संस्थापक अध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, फिरदोस फातेमा, सतीश वानखेडे, रामजानी खान, जाहेद अल्कासेरी, इम्रान बाश्वान, लईक अहमद, अब्दुल राफे, अझहर खान, वासिम अहमद, अश्फाक अहमद व अन्य सदस्य उपस्थित होते. मा. आयुक्त प्रतिभा इ...

मानव विकास पत्रकार संघाची शिरपूर येथे आढावा बैठक संपन्न...

Image
मानव विकास पत्रकार संघाची शिरपूर येथे आढावा बैठक संपन्न... जन क्रांती लाईव्ह न्यूज  प्रतिनिधी/राधेशाम पावरा मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक दिनांक ३ आगस्त रोजी शिरपुर मार्केट कमिटीच्या सभागृहात मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न करण्यात आली असून प्रमुख पाहुणे म्हणुन प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक होते‌. या आढावा बैठकीत मानव विकास पत्रकार संघाचे डॉ प्रदीप पवार आपले विचार माडतांना म्हणालेकी आपण मानव सेवेसाठी काम करतो व नागरिकांच्या समस्या सोडवण्या साठी प्रयत्नशील असतो, त्या साठी लवकरच नागरिकांच्या विविध समस्या चे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहेत! यावेळी मानव विकास पत्रकार संघा कडून 10 वी व 12 वीत प्रथम येणाऱ्या गुणवंतांच्या गुणगौरव करण्यात आले,याच प्रकारे गुटका बंदी, जिल्यातील अवैध धंदे, घरकुल योजना, मार्केट मधील सेवानिवृत्त लोकांची नियुक्ति, एस टी महामंडळ चा भोंगळ कारभारांचा पर्दाफाश करण्यासाठी तालुका व जिल्हयातील विविध विषयावर आज रोजी चर्चा करण्यात आली. नउपस्थित मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय सचिव बी...

महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी - मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण!

Image
महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी - मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण! जन क्रांती लाईव्ह न्यूज  जामनेर तालुका महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत सोनारी - मालदाभाडी शिवरस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमामागील उद्देश शिवरस्त्याच्या अधिकृत हद्दीत कोणतेही अतिक्रमण होऊ नये आणि पर्यावरणपूरक व हरित ग्रामविकासास चालना देणे हा होता. यासाठी मोजणी विभागाने निश्चित केलेल्या सीमारेषेनुसार रस्ता हद्द निश्चित करून, त्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात मंडळ अधिकारी मालदाभाडी, ग्राम महसूल अधिकारी मालदाभाडी, सोनारी व वाघारी, सोनारी व मालदाभाडी येथील सरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “शिवरस्त्याला हरित कवच” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने एक नवा पायंडा पाडत, शासनाच्या महसूल रस्त्यांच्या जतनासोबतच हरित विकासाचा नवा मार्ग...

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

Image
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी... जन क्रांती लाईव्ह न्यूज  जळगाव — गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम संहिता, सिद्धांत आणि संस्कृत विभागाने आयोजित केला होता.प्राचीन भारतातील महान वैद्य महर्षी चरक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  आयोजित केला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांचेसह प्राध्यापक,डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत महर्षि चरक यांना अभिवादन केले.  यावेळी बोलतांना डॉ. बोरोले यांनी महर्षी चरक यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आयुर्वेद शास्त्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानाचे महत्त्व चरक संहितेतील गूढ ज्ञानाचा सखोल अभ्यास करून ते आधुनिक वैद्यकशास्त्रात कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.डॉ. उल्हास पाटील यांनीही ऑनलाईन उपस...