समतानगरमध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 15 ऑंगस्ट दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप ...
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
जळगाव (प्रतिनिधी) – येथील समतानगर परिसरात आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय आवश्यक साहित्याचे वाटप करून उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक संस्था आणि स्थानिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बॅग आदी साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पालक, शिक्षकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिक्षणातील सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.
या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेश बाऱ्हे, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू बाविस्कर, शहर संघटक भिमराव सोनवणे, राष्ट्रवादी महिला संघटक अध्यक्षा जयश्री महेंद्र बिऱ्हाडे, संघटक आदित्य महेंद्र बिऱ्हाडे, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे संघटक गुलाबराव भदाणे, लक्ष्य खान्देशचे संपादक संतोष पट्टीवाले, महाराष्ट्र भरारीचे संपादीका संगीता सागजकर, सामाजिक कार्यकर्ता आनंद महिरे आदी मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
शालेय साहित्य वाटप उपक्रमामुळे परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आयोजक मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.