पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवर आजाराची लक्षणे लक्षात येताच शिक्षकांनी ताबडतोब रुग्णालयात केले दाखल...
पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवर आजाराची लक्षणे लक्षात येताच शिक्षकांनी ताबडतोब रुग्णालयात केले दाखल...
अतिदक्ष शिक्षकांची उत्कृष्ट कामगिरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपचाराकरिता विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला यश.
जन क्रांती लाईव्ह न्यूज
एरंडोल तालुक्यातील पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दि.२४जुलै२०२५रोजी गोवर सदृश्य आजाराची लागण झाल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच संदर्भित सर्व विद्यार्थ्यांना ग्रामिण रुग्णालय एरंडोल येथे आश्रमशाळेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी त्वरित दाखल केले.
वैद्यकीय पथकाने ताबडतोब उपचार सुरू करून गंभीर स्वरूपाची आजाराची लक्षणे दिसून येत असलेल्या काही विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.
आज रोजी सर्व विद्यार्थ्यांची उपचाराअंती प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले असून नवीन गोवर सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची एकही नोंद झालेली नाही.असे दिसून आले आहे
कुठल्याही विद्यार्थ्यांना व्हॅंटीलिटरवर ठेवण्यात आले नाही.
मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सरांनी आश्रमशाळेंना भेट दिली आणि गोवर आजाराचे साथी चे प्रमाणात वाढ होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालय एरंडोल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आजारी विद्यार्थ्यांची अहोरात्री शिक्षकांनी घेतली काळजी तसेच व्यवस्था संस्थेचे सचिव श्री.विजय पाटील यांनी स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना वेळोवेळी दुध,फळे,नास्ता व संपूर्ण जेवनाची व्यवस्था केली.
आश्रमशाळेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर स्वतः पालकांशी संपर्क साधून प्रयत्न केले जाणार आहे व विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत विद्यार्थी हजर केले जाताच वैद्यकीय पथकाच्या सल्याने गोवर लसीकरण राबविण्यात विद्यार्थ्यांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार आहे....
Comments
Post a Comment