डॉ.केतकीताईच्या रूपाने तरूण पिढी देशाचे भविष्य - डॉ. उल्हास पाटील


 डॉ.केतकीताईच्या रूपाने तरूण पिढी देशाचे भविष्य - डॉ. उल्हास पाटील
जन क्रांती लाईव्ह न्यूज 
जळगाव - डॉ. केतकी पाटील हिचा जन्म झाला तेव्हा जळगावला आठ खाटांचे रूग्णालय होते. तिच्या पायगुणाने त्याचे ५० खाटात रूपांतर झाले आणि आता गोदावरी आईच्या नावाने हि हेल्थसिटी उभी राहिली आहे. वक्तशीरपणा, स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रम हे डॉ. केतकीताईमधील गुण असून तिच्या रूपातील तरूण पिढी हे देशाचे भविष्य असल्याचे मत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता वैद्य हर्षल बोरोले, होमीओपॅथीचे अधीष्ठाता डॉ. आर.के. मिश्रा, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत,राजपुरोहीत डी.टी.राव, संजय भिरूड आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सत्कार समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीसह डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. केतकी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 
कौटुंबिक मुल्येही जोपासा - डॉ. केतकी पाटील 
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याची बौध्दिक क्षमता ही दांडगीच आहे. या संस्थेत पाय ठेवल्यानंतर संस्थेचे गोदावरी हे नाव लक्षात घेतल्यास आपल्या प्रत्येकात मातृभक्ती जागृत झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने शिकून कर्तबगार झाल्यानंतर करीअरसोबत कौटुंबिक मुल्येही जोपासावी असा सल्ला गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।