आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे...
आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे...
जन क्रांती लाईव्ह न्यूज
नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 6/8/2025 बुधवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.रोहितकुमार राजपूत यांची भेट घेऊन निवेदन दिले..
निवेदनाचा आशय असा आहे की आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद होण्यासाठी गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने रास्ता रोको निवेदने देऊनही अद्याप पर्यंत शासनाने दखल न घेतल्याने आज अंतिम इशारा निवेदन देऊन अवजड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे..!
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन नेते महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, प्रदेशाध्यक्ष विकीभाई भोळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत (टिल्लूभाई) साळवे, युवा नेते विशालभाऊ वाघमारे, लक्ष्मीबाई गायकवाड, युवा नेते कुणालजी शर्मा, मयूर चव्हाण, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!