नाचणखेडा परिसरातील मा.अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांनी अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची केली पाहणी..
नाचणखेडा परिसरातील मा.अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांनी अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची केली पाहणी..
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली.
सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
बाधित कुटुंबांची पाहणी
अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
शेती नुकसानीची पाहणी
• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील
• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी
• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख
यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले.
प्रशासनाचे निर्देश
मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.