मानव विकास पत्रकार संघाची शिरपूर येथे आढावा बैठक संपन्न...

मानव विकास पत्रकार संघाची शिरपूर येथे आढावा बैठक संपन्न...
जन क्रांती लाईव्ह न्यूज 

प्रतिनिधी/राधेशाम पावरा
मानव विकास पत्रकार संघाची आढावा बैठक दिनांक ३ आगस्त रोजी शिरपुर मार्केट कमिटीच्या सभागृहात मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न करण्यात आली असून प्रमुख पाहुणे म्हणुन प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक होते‌.

या आढावा बैठकीत मानव विकास पत्रकार संघाचे डॉ प्रदीप पवार आपले विचार माडतांना म्हणालेकी आपण मानव सेवेसाठी काम करतो व नागरिकांच्या समस्या सोडवण्या साठी प्रयत्नशील असतो, त्या साठी लवकरच नागरिकांच्या विविध समस्या चे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहेत!

यावेळी मानव विकास पत्रकार संघा कडून 10 वी व 12 वीत प्रथम येणाऱ्या गुणवंतांच्या गुणगौरव करण्यात आले,याच प्रकारे गुटका बंदी, जिल्यातील अवैध धंदे, घरकुल योजना, मार्केट मधील सेवानिवृत्त लोकांची नियुक्ति, एस टी महामंडळ चा भोंगळ कारभारांचा पर्दाफाश करण्यासाठी तालुका व जिल्हयातील विविध विषयावर आज रोजी चर्चा करण्यात आली.

नउपस्थित मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय सचिव बी व्ही गिरासे, पत्रकार हिरा वाकडे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडीतराव निकम, तालुका अध्यक्ष कैलास राजपूत, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पावरा, तालुका उपाध्यक्ष राध्येशाम पावरा धुळे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, शिरपुर शहर अध्यक्ष भटू धनगर, राजेन्द्र निळकंठ, विलास जाधव, दिपक महाले, रवि पेंढारकर,डैनी चांदे साबीर मनियार, संतोष जव्हेरी,  आदि उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन बी व्ही गिरासे यांनी केले, आभार कैलास राजपूत यांनी मानले...

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।