नांदगाव तालुक्यातील अन्याय ग्रस्त उपोषणकर्त्या महिलेला न्याय देण्यासाठी भिमटोला सामाजिक संघटनेचा पाठिंबा...

नांदगाव तालुक्यातील अन्याय ग्रस्त उपोषणकर्त्या महिलेला न्याय देण्यासाठी भिमटोला सामाजिक संघटनेचा पाठिंबा...
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
नाशिक (प्रतिनिधी) दिनांक 14/8/2025 गुरुवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई गायकवाड यांनी विभागीय महसुल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असुन न्यायासाठी लढाई संविधानिक मार्गाने सुरु केली आहे.

मौजे बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी सौ.लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड यांच्या मालकीचे गट नंबर 310 ही शेतजमीन असून त्यांच्या मालकी हक्काचे दस्त व कागदपत्रे असतानाही तेथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक जमिनीत येण्यास मज्जाव करून जीवे ठार मारण्याची धमकी देतात यापूर्वी ह्या गावगुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलही आहे
 ते पीडीतेला मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव करतात ह्या सर्व गंभीर बाबीकडे सरकारने
लक्ष द्यावे योग्य ती चौकशी करुन न्याय द्यावा 
अशा मागण्यांसाठी नाशिक रोड  विभागीय महसूल आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण छेडले आहे 

याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेने जाहिर पाठिंबा दिला असून भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,  उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत (टिल्लूभाई) साळवे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर, प्रसिद्धी प्रमुख भिमयोद्धा प्रतिक सोनटक्के , सुखदेव मैसमाळे , विश्वास हंडोरे, प्रशांतजी गांगुर्डे, आर पी आय (A) विनोद भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।