Posts

Showing posts from June, 2025

वनखात्याच्या‌ आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात...

Image
वनखात्याच्या‌ आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात... मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  दि.१९:–वरणगांव (भुसावळ) | प्रतिनिधी  गावच्या व परिसरातील हद्दीतील राखीव जंगल व सार्वजनिक जमिनींवरील हिरव्यागार डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड सुरू असुन,यामध्ये वनखात्याचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दिवसाढवळ्या झाडे कापली जात असतांना संबंधित खात्याचे कर्मचारी शांत का?असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. **मिळालेल्या माहितीनुसार,अज्ञात ठेकेदार व स्थानिक टोळ्यांमार्फत शासनाचा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणावर लिंब,साग,बाभूळ,सिसु,खैर यांच्यासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल (खुन)होत असुन ही लाकुड दिवसाढवळ्या ट्रॅक्टरद्वारे नेली जात आहेत.या हालचालीकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.देशाच्या जनतेने  भोगलेल्या कोरोनासारख्या महामारीत निसर्गागाने ऑक्सिजनची आवशक्यता काय असते मानवसृष्टी जगविण्यासाठी वृक्षांनपासुन मिळणाऱ्या ऑक्सिजनची क...

मालेगाव मनपा अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या त्वरित निलंबनाची मागणी...

Image
मालेगाव मनपा अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित   अधिकाऱ्याच्या त्वरित निलंबनाची मागणी... मालेगाव प्रतिनिधी मुख्य संपादक शांताराम झाल्टे  येथील महापालिकेत सहायक आयुक्तांसमोर लोकसेवक जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, माहिती अधिकार संघटनेने संबंधित अधिकाऱ्याचे निलंबित करण्याची मागणी केली आहे.येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी मनपाचे अग्निशमन विभागप्रमुख संजय पवार यांच्याकडे १५ एप्रिल २०२५ या एका दिवसाचे हालचाल रजिस्टर माहिती अधिकारात मागितले होते.त्यासंदर्भात बच्छाव यांना माहिती न देता २८ रुपयांचे चलन भरण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी चलन भरल्यानंतर त्यांनी मागितलेली माहिती निरंक असल्याबाबत सांगण्यात आले. त्यावर बच्छाव यांचे समाधान न झाल्याने त्यांनी मनपाचे सहायक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी तौसिफ शेख यांच्याकडे अपील दाखल केले होते. Lयासंदर्भात गुरुवारी (दि.१२) सुनावणी होती. यावेळ...

गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केली अटक...

Image
गंगापूर तालुक्यातील  पुरवठा निरीक्षण अधिकारी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केली अटक... गंगापूर | प्रतिनिधी  मुख्य संपादक शांताराम झाल्टे  गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांचन कांबळे (वय ३४) यांना ₹४०,०००/- हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) छत्रपती संभाजीनगर युनिटने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार (वय ३२) यांच्या आजोबांच्या नावे मौजे काटेपिंपळगाव ता. गंगापूर येथील रास्त भाव दुकान क्र.२९ होते. सदर दुकानाचा वारसाने मिळालेला प्राधिकारनामा निलंबित करण्यात आला होता. हे निलंबन मागे घेण्यासाठी आरोपी अधिकारी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी मिळून ₹७०,०००/- लाच मागितली होती. तक्रारदाराने ही माहिती १२ जून २०२५ रोजी ला.प्र.वि. कार्यालयात दिली. पडताळणी आणि सापळा कारवाई: १३ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. चर्चेदरम्यान आरोपी कांबळे यांनी तडजोड करून ₹४०,०००/- लाच स्वीकारण्याचे कबूल केले होते. त्यानुसार १४ जून रोजी वस्तू व सेवा कर भवनजवळ, रेल्वे स्टेशन ...
Image
अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...। विठ्ठल मंदिराच्या नावाखाली सप्तशृंगी देवीचा सभामंडप भाविकांसह प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल.   मुख्य संपादक/शांताराम झाल्टे  पहूर , ता . जामनेर ( ता . ९ ) अस्तित्वात नसलेल्या जय सप्तशृंगी निवासीनी मातेच्या मंदिरासमोर  शासनाच्या २५ - १५ योजनेतून  सुमारे ४५ लाखांच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असून  प्राचीन मंदिरांना विकासाच्या योजनांपासून  डावलल्या जात असल्याचा प्रकार  समोर आला आहे .           वाघुर नदीच्या काठी पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारा जवळ ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर ८० बाय ३० आकारात  भव्य सभा मंडप उभारला जात आहे . सदर सभामंडप चक्क अस्तित्वात नसलेल्या परंतु ' क ' वर्ग  दर्जा प्राप्त जय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट समोर होत आहे .  विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल राऊत आणि जय सप्तशृंगी मा ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे या दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे . माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे भाविकांची आणि प्रश...
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना चोपडा कार्यकारणी ची बैठक उत्साहात संपन्न.। जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे  स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकजी कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेशजी शेवाळे देवा व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा तथा विश्वस्त सौ धनश्रीताई उत्पात तसेच सर्व विश्वस्तांच्या  मार्गदर्शनाखाली चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक.२६/०१/२०२५ रविवार रोजी ठीक ११ वाजता स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली सदर बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांची उपस्थिती होती.त्यानंतर खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांचा जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड आणि जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भुसावळ तालुकाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांचा सत्कार तालुका सहसंघटक पवन कोळी यांनी केला तसेच भुसावळ तालुका संपर्कप्रमुख इमरान खान यांचा सत्कार प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाट...

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न...

Image
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर : मुख्य संपादक शांताराम झाल्टे  दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालय चोपडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शासकीय रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील आयोजन करताना स्टेट बँक ऑफ इंडिया ला 70 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एकूण 71 रक्त दात्यांनी समाजाचे देणे लागतो हा उद्देश ठेवून चोपडा शहरातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करून दिले.रक्तदान शिबिराला स्टेट बँक ऑफ इंडियाचे  सहाय्यक महाप्रबंधक धर्मेंद्र कुमार व प्रकाश बिशवाल आशिष जाधव व प्रशासनिक कार्यालय जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गजानन पाटील,संकेत खोडवे,विशाल तांगडे,वाल्मीक बागुल,रवी हरणे आणि इतर कर्मचारी व अधिकारी चोपडा यांनी परिश्रम घेतले.चोपडा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश पाटील,दीपक पगारे व इतर सर्व कर्मचारी बांध...

चोपडा येथील शिवसेना उ बा ठा पक्षाच्या उपनेते पदी गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार...

Image
चोपडा येथील शिवसेना उ बा ठा पक्षाच्या उपनेते पदी गुलाबराव वाघ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार...  मुख्य संपादक शांताराम झाल्टे  चोपडा - शिवसेना पक्षाचे उपनेते व रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे चोपडा येथील बैठकीसाठी आले असताना आढावा बैठक घेण्यात आली व त्यांची शिव सेना उपनेते दीप निवड झाल्याबद्दल चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक डॉ.महेंद्र पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख चंद्रकात शर्मा शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे युवा सेनेचे शहर प्रमुख दीपक माळी शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र भोई शशि कन्हैय माजी महीला आघाडी ता प्रमुख सूनदा ताई पाटील कमलेश बडगुजर बाळू कोळी प्रवीण लोहार मनोहर पाटील गोपाल पाटील संदीप कोळी यांच्यासह शिवसेना युवा सेना महीला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केला आभार प्रदर्शन दिपक माळी यांनी मानले

पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच पत्रकारांकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे:स्वाभिमानी सेना,महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,व लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर मागणी...!

Image
पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच पत्रकारांकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे:स्वाभिमानी सेना,महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,व लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर मागणी...!    उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे ,ना. अजितदादा पवार यांच्या कडे दिले निवेदन.              मुख्य संपादक शांताराम झाल्टे   औरंगाबाद :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,सर्वच पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन, करून त्या मार्फत पत्रकारांना मानधन व. इतर सर्वत्र सोयी-सुविधा, सवलती देण्यासाठी राज्य शासनाने त्वरित उच्चस्तरीय समिती गठीत करावी,अत्यंत मूलभूत गरजेची हि जाहीर मागणी त्वरित मंजुर करावी अशी मागणी स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ,लोकशाही मराठी पत्रकार संघ, यांच्या वतीने महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व. ना. अजितदादा पवार, यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, ...

येवला सा.बां.विभाग अंतर्गत अंदरसुल - बोकटे रस्त्याचे वाजले कि बारा खड्ड्यात गेला रस्ता--चौकशी ची जाहीर मागणी,

Image
येवला सा.बां.विभाग अंतर्गत अंदरसुल - बोकटे रस्त्याचे वाजले कि बारा खड्ड्यात गेला रस्ता--चौकशी ची जाहीर मागणी,                    सा.बां.विभाग येवला यांचा भोंगळ मनमानी कारभार  मुख्य संपादक शांताराम झाल्टे  नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- डॉ शेरूभाई मोमीन  येवला तालुक्यातील, सा.बां.विभाग अंतर्गत, मौजे अंदरसुल- बोकटे,येथील पाच किलोमीटर अंतरावरील अवघ्या काही महिन्यातच रस्ता संपूर्णपणे उधळून गेल्याने, या परिसरातील सर्व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, तसेच रस्त्याच्या आजूबाजूला, मोठ्या प्रमाणात काटवणाचे झाडे देखील रस्त्यावर आल्याने वाहने चालविने देखील अवघड झाली आहे. व रस्त्याच्या आजू बाजूला साईड पट्ट्या देखील नसल्याने, अनेकदा नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे,  सा.बां.विभाग येवला यांचा मनमानी कारभार केव्हा बंद होणार अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे.  ऐन जून महिन्यातील पावसाच्या झटक्याने संपूर्णपणे रस्त्याने खडी उधळून खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना...

जामनेर तालुका – महसूल मंडळ वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” उत्साहात संपन्न...

Image
जामनेर तालुका – महसूल मंडळ वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” उत्साहात संपन्न... मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  दिनांक ०२ जून २०२५ रोजी जामनेर तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार पडले. या शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा थेट लाभ घेतला. तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांनी प्रास्ताविक केले . त्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला – नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवणे व शासनाच्या योजनांचा थेट लाभ गावात उपलब्ध करून देणे. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत वाकडीचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विभागनिहाय सेवा व लाभ: • संजय गांधी निराधार योजना (DBT प्रक्रिया): ७८ लाभार्थ्यांना लाभ • तालुका कृषी अधिकारी कार्यालय: ६८ शेतकऱ्यांना सेवा • पुरवठा विभाग – शिधापत्रिका: ६४ लाभार्थ्यांना वाटप • सेतू केंद्रमा...

हजरत पिर बाबा सैलानी शाहमियाँ दर्गाह परिसरात सर्व प्रकारे प्रलंबित कामे व विविध विकास केव्हा होणार...??अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती यांच्या वतीने निवेदन...

Image
हजरत पिर बाबा सैलानी शाहमियाँ दर्गाह परिसरात सर्व प्रकारे प्रलंबित कामे व विविध विकास केव्हा होणार...??अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती यांच्या वतीने निवेदन...  नाशिक /प्रतिनिधी : डॉ. शेरूभाई मोमीन           संपूर्ण महा.राज्यासह पर राज्यातील, देखील, सर्व धर्म समभाव भाईचारा मानवतेचा व. बंधू भाव प्रेम, जातीय सलोखा, आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एकमेव श्रद्धास्थान असलेले नवसाला पावणारे एकमेव, असलेले प्रतीक हजरत पिर बाबा सैलानी सरकार दर्गाह शरिफ येथे भक्तनिवास लाईट रस्ते, भूमीगत गटारी योजना यांसह संपूर्णपणे विकास होणार का हि सर्व भाविक भक्त गण व सर्व ग्रामस्थ यांची विशेष जाहीर मागणी प्रलंबित पडलेली आहे, मु.पो.सराई पिंपळगाव ता. चिखली जि. बुलढाणा महाराष्ट्र येथील राज्याचे सर्व - धर्मीयांचे नवसाला पावन झालेले जागती ज्योत जागृत देवस्थान, हजरत पिर दरबार बाबा सैलानी दर्गाह, च्या परिसरातील भक्त निवास रोड रस्ते लाईट पाणी भूमिगत गटारी हि सर्व मूलभूत व्यवस्था आणि सर्वच या परिसरचा भरीव सर्वांगिण विकास केव्हा होणार.....???  दररोज पणे कायमस्वरूपी नाशिक ...

एरंडोल शहरात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ...आरोपीला पकडण्यात एरंडोल पोलिसांची कामगिरी.

Image
एरंडोल शहरात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ... आरोपीला पकडण्यात एरंडोल पोलिसांची कामगिरी. मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  फिर्यादी...किशोर सुरेश बडगुजर वय 36 रा. कढोली ता. एरंडोल यांची HF डीलक्स मो. सा. क्र. MH 19 CN 1772 ही दि.19/05/25 रोजी कढोली ता. एरंडोल येथून चोरी झाली होती. एरंडोल पो.स्टे गुरन 86/25 BNS कलम 303(2) मधील आरोपी दिलीप शांताराम पाटील रा.टिटवी ता. पारोळा हा मो. सा. सह तपासा दरम्यान बांबूरुड महादेवाचे ता.भडगाव येथे मिळून आला... पुढील तपास कामी.... 1)HC महेंद्रसिंग पाटील 2)PN दत्तात्रय ठाकरे करीत आहे 

हिंदू धर्म रक्षणी राज राजेश्वरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलांना पुरस्कार...

Image
हिंदू धर्म रक्षणी राज राजेश्वरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलांना पुरस्कार... मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर   बभळाज ग्रामपंचायत च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासन  महिला बालकल्याण विभाग अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीला, शासनाच्या विविध योजना सर्व ग्रामस्थांपर्यंत पुरवुन आपली ओळख निर्माण केलेल्या महीलांना पुरस्कार म्हणुन प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले़ 1)आरोग्य सेविका एम.एम गौंडर यांना लोकनियुक्त सरपंच  योगिता बाई अजमल जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले  2) अंगणवाडी सेविका यमुनाबाई भुरा राठोड यांना उपसरपंच संजय पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 3) अंगणवाडी सेविका उषा दिलीप धनगर यांना तंटामुक्ती अध्यक्ष छोटू सिंग राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले  4) अंगणवाडी सेविका माया चिंतामण भालेराव यांना मधुकर सुका भि...

पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामनेरचे पत्रकार शांताराम झाल्टे यांचा सत्कार ...

Image
पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामनेरचे पत्रकार शांताराम झाल्टे यांचा सत्कार ... मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि १जून २०२५रोजी मलकापूर येथे सत्कार समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वात प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी  दैनिक अहिल्याराजच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने,हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आलेल्या  पत्रकारांचा सत्कार. सत्कार सोहळामधे जामनेर चे पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक,शिक्षक साहित्य, क्रीडा आदि क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक मान्यवरांना २०२५चा इंडियन एक्सलन्स अवार्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात मलकापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.