गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केली अटक...

गंगापूर तालुक्यातील  पुरवठा निरीक्षण अधिकारी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केली अटक...
गंगापूर | प्रतिनिधी 
मुख्य संपादक शांताराम झाल्टे 
गंगापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांचन कांबळे (वय ३४) यांना ₹४०,०००/- हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) छत्रपती संभाजीनगर युनिटने रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार (वय ३२) यांच्या आजोबांच्या नावे मौजे काटेपिंपळगाव ता. गंगापूर येथील रास्त भाव दुकान क्र.२९ होते. सदर दुकानाचा वारसाने मिळालेला प्राधिकारनामा निलंबित करण्यात आला होता. हे निलंबन मागे घेण्यासाठी आरोपी अधिकारी कांचन कांबळे यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी मिळून ₹७०,०००/- लाच मागितली होती. तक्रारदाराने ही माहिती १२ जून २०२५ रोजी ला.प्र.वि. कार्यालयात दिली.

पडताळणी आणि सापळा कारवाई:
१३ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. चर्चेदरम्यान आरोपी कांबळे यांनी तडजोड करून ₹४०,०००/- लाच स्वीकारण्याचे कबूल केले होते. त्यानुसार १४ जून रोजी वस्तू व सेवा कर भवनजवळ, रेल्वे स्टेशन बाजूला सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ₹४०,०००/- घेताच आरोपी कांचन कांबळे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

झडतीत सापडलेले साहित्य:
अंगझडतीत iPhone 13 Pro, दुसरा मोबाईल, गाडीच्या डिकीत लाचेची रक्कम ₹४०,०००/- व पर्समध्ये ₹३,०००/- आढळले. दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांचे विश्लेषण सुरू आहे. आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 आणि 7A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेदांत नगर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.

सापळा अधिकारी, वाल्मीक कोरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,सहायक अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे, पो. उप अधीक्षक,मार्गदर्शक अधिकारी: संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक

आवाहन:
जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणीही अनधिकृतरित्या लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 0240-2344050 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।