भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न...
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर :
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालय चोपडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शासकीय रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील आयोजन करताना स्टेट बँक ऑफ इंडिया ला 70 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एकूण 71 रक्त दात्यांनी समाजाचे देणे लागतो हा उद्देश ठेवून चोपडा शहरातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करून दिले.रक्तदान शिबिराला स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक धर्मेंद्र कुमार व प्रकाश बिशवाल आशिष जाधव व प्रशासनिक कार्यालय जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच गजानन पाटील,संकेत खोडवे,विशाल तांगडे,वाल्मीक बागुल,रवी हरणे आणि इतर कर्मचारी व अधिकारी चोपडा यांनी परिश्रम घेतले.चोपडा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश पाटील,दीपक पगारे व इतर सर्व कर्मचारी बांधव यांनी रक्तदान शिबिर आयोजन करण्यासाठी मेहनत घेऊन शिबिर आयोजित करण्यात अनमोल सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment