मालेगाव मनपा अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या त्वरित निलंबनाची मागणी...
मालेगाव मनपा अधिकाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या त्वरित निलंबनाची मागणी...
मालेगाव प्रतिनिधी
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
येथील महापालिकेत सहायक आयुक्तांसमोर लोकसेवक जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, माहिती अधिकार संघटनेने संबंधित अधिकाऱ्याचे निलंबित करण्याची मागणी केली आहे.येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी मनपाचे अग्निशमन विभागप्रमुख संजय पवार यांच्याकडे १५ एप्रिल २०२५ या एका दिवसाचे हालचाल रजिस्टर माहिती अधिकारात मागितले होते.त्यासंदर्भात बच्छाव यांना माहिती न देता २८ रुपयांचे चलन भरण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी चलन भरल्यानंतर त्यांनी मागितलेली माहिती निरंक असल्याबाबत सांगण्यात आले. त्यावर बच्छाव यांचे समाधान न झाल्याने त्यांनी मनपाचे सहायक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी तौसिफ शेख यांच्याकडे अपील दाखल केले होते. Lयासंदर्भात
गुरुवारी (दि.१२) सुनावणी होती. यावेळी बच्छाव यांनी माहिती जर निरंक दिली, तर २८ रुपयांचे शुल्क का घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बच्छाव याने अरे-तुरे केल्याचा आरोप पवार यांनी केला. यातूनच पवार यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोरच बच्छाव यांना
अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यासंदर्भातील संपूर्ण व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या शिवीगाळ व धमकी प्रकरणाची दखल राज्य माहिती अधिकार संघटनेने घेतली आहे. त्यांनी पवार यांना निलंबित करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
चौकट...
माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे हे एक गंभीर आणि गैरकानुनी कृत्य आहे. या कृत्यामुळे लोकशाही, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांवर परिणाम होतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण देणे आणि त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
-विठोबा द्यानद्यान, माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते
Comments
Post a Comment