ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जामनेर पंचायत समिति येथे सभेचे आयोजन-जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे आवाहन...।
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जामनेर पंचायत समिति येथे सभेचे आयोजन-जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे आवाहन...। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे सरपंच आरक्षण सोडत सभेची जाहीर सूचना तालुका जामनेर याव्दारे संबंधित ग्रामपंचायत अधिनस्त गावातील नागरिकांना आवाहन केले जात असून मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या खालील ग्रामपंचायतींकरीता अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी दिनांक 30/01/2025 रोजी तहसिलदार जामनेर यांचे अध्यक्षतेखाली स्थळ- पंचायत समिती मिटींग हॉल, पंचायत समिती, जामनेर येथे सकाळी 11.00 वाजता ...