सवतखेडा येथील दोन शेतकऱ्यांवरती एकाच वेळी कोसळले पशुधन चोरीचे आसमानी संकट...।
सवतखेडा येथील दोन शेतकऱ्यांवरती एकाच वेळी कोसळले पशुधन चोरीचे आसमानी संकट...।
मि.पळासखेडे/प्रतिनिधी -प्रकाश पाटील
सवतखेडा भागात चोरींच्या प्रमाणात वाढ
स्थानिक भागातील लोकांमध्ये घबराहट.!
मौजे -सवतखेडा तालुका. जामनेर येथील रहिवासी दोन शेतकरी श्री. ज्ञानेश्वर शिवाजी पाटील वय -38 धंदा -शेती यांचे गावाला लागूनच असणाऱ्या गोठ्या मधून अज्ञात चोरट्यांनी दिनांक 22 जानेवारी 2025 वार बुधवार रोजी मध्यरात्री एक पांढऱ्या रंगाचा बैल व त्यांचे शेजारी लागूनच असणाऱ्या गोठ्या मधून त्याच रात्री त्याच वेळेला श्री.राजू विठ्ठल बोरसे. वय 49 नंदा शेती यांचे एक गाय व दोन पांढऱ्या रंगाचे बैल असे एकूण पाच गुरे रात्रीच्या वेळेला अज्ञात चोरट्यांनी चोरून प्रसार केली. त्या संबंधित तक्रार जामनेर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
परिसरामध्ये वारंवार होत असणाऱ्या गुरे चोरीमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
Comments
Post a Comment