ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जामनेर पंचायत समिति येथे सभेचे आयोजन-जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे आवाहन...।

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जामनेर पंचायत समिति येथे सभेचे आयोजन-जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे आवाहन...।मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 
सरपंच आरक्षण सोडत सभेची जाहीर सूचना तालुका जामनेर                         याव्दारे संबंधित ग्रामपंचायत अधिनस्त गावातील नागरिकांना आवाहन केले जात असून मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या खालील ग्रामपंचायतींकरीता अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी दिनांक 30/01/2025 रोजी तहसिलदार जामनेर यांचे अध्यक्षतेखाली स्थळ- पंचायत समिती मिटींग हॉल, पंचायत समिती, जामनेर येथे सकाळी 11.00 वाजता खालील नमूद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर सभेस उपस्थित राहण्याबाबत सदर प्रेस नोट द्वारे आवाहन करण्यात येत आहे.
सरपंच आरक्षण सोडत ग्रामपंचायत गावेंची नावे खालीलप्रमाणे--
१.वाकी खुर्द
२.जंगीपुरा 
३.डोहरी
 ४.वडगाव बु.
 ५.भारूडखेडा

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।