नवीन ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा माजी सरपंच पतीने हुकूमशाहीने केला संपन्न...।
*नवीन ग्रामपंचायतीचा लोकार्पण सोहळा माजी सरपंच पतीने हुकूमशाहीने केला संपन्न...।*
*ग्रामपंचायत इमारत लोकार्पणात नियमांची पायमल्ली*
*सरपंच पतीचा मनमानी कारभार व हुकूमशाही.!*
*शेंगोळा गावात चर्चेला उधान.?*
*गावातील नव्याने सरपंच असल्यावर सुद्धा ग्रामपंचातीत माजी सरपंचाचे फलक जशाचतसे.।*
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे
जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे नुकत्याच उभारण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला वादाची किनार लाभली आहे. माजी सरपंच दिलीप रडाळ यांनी त्यांच्या सोबत 10 जणांना घेऊन परस्पर लोकार्पण सोहळा आयोजित केला. यामध्ये विद्यमान महिला सरपंच सरला मोहन बेलेकर आणि अन्य सदस्यांना पूर्णपणे डावलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
विद्यमान सरपंच सरला बेलेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली नाराजी व्यक्त केली. "हा कार्यक्रम दोन-तीन दिवसांत आयोजित करणार होतो. आम्ही पूर्ण तयारी केली होती,मात्र, माजी सरपंचांनी मनमानी कारभार करत आमच्यावर दबाव आणला आणि परस्पर कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या लावलेल्या कोनशिलेवर माझे नाव सरपंच म्हणून न लावता सदस्य म्हणून लावले गेले, हे अत्यंत चुकीचे आहे,असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत इमारत लोकार्पणात नियमांची पायमल्ली
माजी सरपंचांनी लोकार्पण सोहळ्याच्या नावाखाली शासकीय नियमांचे उल्लंघन करत मनमानी कारभार केला असल्याचे सरपंच बेलेकर यांचे म्हणणे आहे. शासकीय कामात अडथळा आणण्याचा हा प्रकार असून, हा माझ्या सरपंचपदाचा आणि महिला सन्मानाचा अपमान आहे. हे मला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी सरपंचांकडून दडपशाहीचा आरोप
आम्ही तयार केलेली कोनशिला लावण्यासही आम्हाला मनाई करण्यात आली. उलट, 'तुम्ही ही कोनशिला कशी लावणार, ते आम्ही पाहू,' असे धमकीवजा बोलण्यात आले. हा प्रकार अपमानास्पद असून नियमांची सर्रास पायमल्ली झाली आहे, असा गंभीर आरोप सरपंच बेलेकर यांनी केला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात महिला सरपंचांवर अन्याय
सरपंच बेलेकर यांनी हा मुद्दा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघाशी संबंधित असल्याचे नमूद करत, महिला सरपंच असताना झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. हा महिलांच्या सन्मानाला तडा देणारा प्रकार आहे, असे सांगितले.
न्यायाची मागणी
सरपंच सरला बेलेकर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार असून, लावलेली कोनशिला त्वरित काढण्यात यावी व नवीन कोनशिला नियमानुसार बसवली जावी, अशी मागणी केली आहे.
गावात या प्रकरणावरून मोठी चर्चा रंगली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यमान महिला सरपंचांनी त्यांच्या अपमानाचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment