तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।


जामनेर/शांताराम झाल्टे 

तालुक्यातील पत्रकारांविषयी संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।

जामनेर तालुक्यातील पत्रकारांवर आक्षेप घेणारी आणि गलीच्छ भाषेत लिहिलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. संदीप श्यामराव पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या घटनेमुळे पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आज रोजी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संदीप श्यामराव पाटील यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले आहे.

पत्रकार संघटनेंची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
 या प्रकारच्या पोस्टमुळे पत्रकारांच्या कार्यावर दबाव येत असून, समाजात चुकीचे संदेश पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार बांधवांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन देत अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सर्वांचे लक्ष कारवाईकडे या घटनेनंतर पोलिसांकडून संबंधित पोस्टची सत्यता तपासली जात आहे. आरोपीवर कोणती कारवाई केली जाईल का? याकडे सर्व पत्रकारांचे लक्ष लागलेले आहे. समाज माध्यमांवरील अशा गैरवापरामुळे पत्रकारांच्या कार्याला अडथळे निर्माण होत असल्याचे पत्रकार बांधवांनी सांगितले आहे. त्यामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।