गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

गारखेडा/प्रतिनीधी-सुनिल चौधरी 
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे घराजवळ काम करत असताना नागाने डाव्या हाताला दंश केल्यामुळे २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. 
राजू संतोष गायकवाड (वय २७, रा. गारखेडा, ता. जामनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजू गायकवाड शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजू घराजवळ काम करत असताना नागाने त्याच्या डाव्या हाताला दंश केला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले, पण स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गारखेडा गावात शोककळा पसरली असून सर्पतज्ज्ञांच्या माहितीनुसार, चाव्याच्या खुणांवरून नाग जातीचा साप असल्याचा अंदाज राजेश सोनवणे यांनी सांगितली आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।