अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?
अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी संतप्त भाविकांकडून होत आहे .
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
पहूर , ता . जामनेर ( ता . १० ) जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अस्तित्वातच नसलेल्या जय सप्तशृंगी माता निवासिनी मंदिरात वर्षभरात सुमारे सव्वा लाख भाविक दर्शन घेत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे .
जय सप्तशृंगी मा निवासिनी मंदिराचे बनावट दस्तऐवज तयार करून राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे ग्रामीण तीर्थ विकास योजनेअंतर्गत ' क 'वर्ग मिळवण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ' जन क्रांती लाईव्ह न्यूज च्या हाती आले असून गावात एकच खळबळ उडाली आहे .
विशेष म्हणजे या मंदिरात चैत्र पौर्णिमा , अश्विन नवरात्रीनिमित्त यात्रोत्सव भरविण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले।
गेल्या वर्षी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी जय सप्तशृंगी माता निवासीनी मंदिर हरवल्याची तक्रार पहूर पोलीस ठाण्यात दाखल करून शंखनाद आंदोलन केले होते .
जय सप्तशृंगी मॉ निवासिनी ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी संबंधित मंदिराविषयी ग्रामपंचायतीला खोटी माहिती सादर केल्याचे उघड झाले आहे .
आता २५ - १५ योजनेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २४२ वर ४५ लाखांच्या भव्य सभा मंडपाचे काम सुरू आहे .
या कामाबाबत विचारणा केली असता ट्रस्टच्या अध्यक्षांनी विठ्ठल मंदिराचे काम सुरू असल्याचा बनाव केला आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी संतप्त भाविकांनी केली आहे .
Comments
Post a Comment