वंचित बहुजन आघाडीची जळगाव पूर्वची जिल्हा बैठक संपन्न। ------------------------------------------------- भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती। -------------------------------------------------
वंचित बहुजन आघाडीची जळगाव पूर्वची जिल्हा बैठक संपन्न। ------------------------------------------------- भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती। -------------------------------------------------
जन क्रांती लाईव्ह न्यूज
जामनेर(प्रतिनिधी):- भुसावळ येथे वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्वची जिल्हा बैठक पार पडली तसेच भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणीसाठी मुलाखती देखील पार पाडल्या.
आज भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची जळगाव पूर्व बैठक पार पडली.
जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाभरामध्ये येत्या काळामध्ये पक्ष संघटनेच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिरे तसेच तालुका निहाय जनसामान्यांचे प्रश्न यावर आधारित जनआंदोलनाचे भूमिका ठरविण्यात आली.
तालुका निहाय पक्ष संघटना बांधणी अधिक विस्तृत व व्यापक करणे या अनुषंगाने येत्या काळात तालुका निहाय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे व कार्यकर्त्याचे सक्षमीकरण करणे.
तसेच येत्या 9 ऑगस्ट पासून भुसावळ शहरातील झोपडपट्टी पुनर्वसंधारकांचे प्रश्न या अनुषंगाने यशवंत नगर या ठिकाणी असलेल्या बौद्ध समाज बांधवांच्या झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुलाचे प्रश्नाचे अनुषंगाने भुसावळ शहरांमध्ये महाआंदोलन करण्याविषयीची भूमिका पार पडली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष समिती,जिल्हा महासचिव एडवोकेट योगेश तायडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष रफिक भाई बेग, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ इंगळे, जिल्हा संघटक बबन कांबळे जिल्हा संघटक ईश्वर लहासे जिल्हा सदस्य पंकज भालेराव, प्रवीण भालेराव एडवोकेट मोगरे पाटील, यावल तालुका अध्यक्ष भगवान भाऊ मेघे, बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा भाऊ निकम तालुका सचिव सुभाष भाऊ, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे रावेर तालुका अध्यक्ष मुस्ताक भाई शेख, भुसावळ तालुका सचिव गणेश भाऊ इंगळे, बोदवड तालुका युवा अध्यक्ष आशिष गुरचळ, आम्रपाली बागबान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.