जामनेर तालुका सरपंच आरक्षण सोडत सभा- २०२५ ते २०३० कालावधीसाठी १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निश्चित...।

जामनेर तालुका सरपंच आरक्षण सोडत सभा - २०२५ ते २०३० कालावधीसाठी १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निश्चित...।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
आज दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया उत्साहात व पारदर्शक पद्धतीने पार पडली. ही सभा पंचायत समिती, जामनेर येथील सभागृहात पार पडली असून, यामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा जिल्हाधिकारी जळगाव श्री.आयुष प्रसाद सर यांचे मार्गदर्शनाखाली सदर सोडत सभेचे आयोजन करण्यात आले.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या चार प्रवर्गांनुसार १०७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण निश्चित करताना महिला आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रिया मा. उपविभागीय अधिकारी जळगाव (भाग) श्री. विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कार्यक्रमात ७ वर्षांची कुमारी डिंपल पवार हिच्या हस्ते पारदर्शक बरणीमधून चिठ्ठ्या काढण्यात येऊन महिला सरपंच आरक्षणासाठीची सोडत कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
आरक्षण निहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे:
 • अनुसूचित जाती – १० ग्रामपंचायती (त्यापैकी महिला – ५)
 • अनुसूचित जमाती – १५ ग्रामपंचायती (त्यापैकी महिला – ८)
 • नागरिकांचा मागास प्रवर्ग – २९ ग्रामपंचायती (त्यापैकी महिला – १५)
 • सर्वसाधारण प्रवर्ग – ५३ ग्रामपंचायती (त्यापैकी महिला – २७)
याप्रमाणे एकूण ५५ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.
सदर सोडत प्रक्रियेत प्रशासकीय पारदर्शकता, कायदेशीरता व लोकसहभाग यावर भर देण्यात आला. सर्व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या शंका निरसन करून समाधानकारक वातावरणात सोडत प्रक्रिया पार पाडली गेली.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।