आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा --महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न।...

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा --महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न।...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया।

जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
देवशयनी आषाढी एकादशीच्या पुण्यपर्वावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

यंदा नाशिक जिल्ह्यातील श्री. कैलास उगले आणि सौ. कल्पना उगले यांना शासकीय महापूजेचा मान प्राप्त झाला.

या पवित्र दिवशी, सर्व राज्यवासीयांना सत्पथाने चालण्याची प्रेरणा लाभो, राज्यावर येणारी संकटे दूर होवोत, बळीराजास समृद्धी लाभो आणि सर्व वारकऱ्यांना अखंड आनंद व आशीर्वाद लाभावे अशी प्रार्थना मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी यांनी विठुमाऊलीच्या चरणी केली.


Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।