जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव...
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
राष्ट्रीय लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून जामनेर तालुक्यात कुटुंब नियोजनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावद,डॉ.किरण पाटील यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जामनेर तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवळ्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प चे आयोजन करण्यात येते.एक दिवस आधी लाभार्थ्यांना ऍडमिट करून त्याच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येते
जामनेर तालुक्यात मागील वर्षात एकूण ८ पुरुष नसबंदी शक्रक्रिया,१०५ लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया,१०८२ स्री नसबंदी शस्त्रक्रिया अशा एकूण ११९५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
तसेच शस्त्रक्रिया न करता सुद्धा कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यावर लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात येत असते.तालुक्यात २०२४-२०२५ मध्ये ८८ महिलांना प्रसूतीच्या वेळी कॉपर टी बसविण्यात आली,तर ३५५ महिलांना पाळणा लांबवण्यासाठी कॉपर टी बसविण्यात आली,१३० महिलांना अंतरा इंजेक्शन देण्यात आले.तर १०७६ महिलांना गर्भनिरोधक गोळ्या व २०४८ पुरुषांना कंडोम वाटप करून आरोग्य विभामार्फत कुटुंब नियोजन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते व जामनेर तालुक्याचे नियमित सर्जन डॉ.समाधान वाघ,सर्व वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पहूर,आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामुळेच हे कामकाज पूर्ण झाले म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे वरील सर्वांचे आभार मानले पुढेही असेच कामकाज करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.