आझाद मैदान,मुंबई येथे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलनाचे आयोजन...

आझाद मैदान,मुंबई येथे विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलनाचे आयोजन...
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार श्री.गिरिशभाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन 
आंदोलक प्रतिनिधींशी संवाद साधला.

शासन आपल्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.

यावेळी आ. श्री. विक्रम काळे, आ. श्री. किशोर दराडे, आ. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. श्री. किरण सरनाईक, आ. श्री. जयंत आजगावकर यांच्यासह शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते !

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।