सतीश इंगळे यांची जामनेर महसूल नायब तहसीलदार पदी नियुक्ती.।
सतीश इंगळे यांची जामनेर महसूल नायब तहसीलदार पदी नियुक्ती.। जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
आपल्या नेमकेपणा, शांत स्वभाव आणि प्रामाणिक कार्यपद्धतीने प्रशासनात वेगळा ठसा उमठवणारे श्री. सतीश इंगळे यांनी जामनेर तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार पदाचा कार्यभार नुकताच हर्षोल्हासात स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे तहसील कार्यालयात आणि नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सतीश इंगळे यांनी आतापर्यंतच्या सेवेत नागरिकांच्या कामांना प्राधान्य देत पारदर्शक व त्वरित सेवा देण्यावर भर दिला आहे. महसूल विभागाच्या विविध कामांमध्ये त्यांनी उत्कृष्ट योगदान दिले असून, त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असते.या प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले आणि पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.नियुक्तीनंतर बोलताना सतीश इंगळे यांनी लोकहिताचे व पारदर्शक प्रशासन हेच आपले ध्येय असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि योग्य सेवा देण्याचा प्रयत्न करेन, असे मत व्यक्त केले. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या।
Comments
Post a Comment