राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष -राज्यभरातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संतप्त...।

राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष -राज्यभरातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संतप्त...।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
 जनतेने मोठ्या विश्वासाने युती शासनाची प्रचंड बहुमताने निवड केली.सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे.या कालावधीत मागील शासनाने आश्वासित केलेल्या मागण्यां संदर्भात ठोस निर्णय घेऊन सकारात्मक कार्यवाही होऊ शकली नाही हे वास्तव आहे.आपली भेट घेऊन चर्चा करण्यास्तव वेळ मिळावा यासागणी विनंती पत्रे सादर करण्यात आली, परंतु त्या संदर्भात अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही.

मागील एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांबावत जी आश्वासने दिली त्याबाबत कोणतीही सकारात्मक प्रागतिक कार्यवाही झालेली नाही. सोबत आपल्या माहितीसाठी २० मागण्यांची सनद सादर करीत आहोत.

प्रलंबित मागण्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी शिक्षक आज बुधवार दि. ९ जुलै २०२५ रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर, मोर्चाने जाऊन निदर्शने करीत आहेत.

आज देशातील ११ कामगार संघटना सुध्दा सांप्रत केंद्र शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप करीत आहेत. या संपास, आमच्या आजच्या आंदोलनाव्दारे जाहीर पाठिंबा देऊन, भविष्यातील संभाव्य तीव्र लढयासाठी सिध्द होत आहोत.

कृपया या निवेदनाची दखल घेऊन संघटनेसह चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी वेळ व तारीख द्यावी अशी विनंती आहे. आमची सदर विनंती बेदखल झाल्यास कर्मचारी-शिक्षकांच्या दबावामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये, महाराष्ट्र राज्यात, कर्मचारी-शिक्षकांचे संप आंदोलन,अटळ ठरेल. अश्या आशयाचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।