पळसखेडे बु .येथे अवैध वाळू-मुरूम साठ्यावर जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची मोठी कारवाई...।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
पळसखेडे बु. (ता. जामनेर) येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या बांधकामस्थळी तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी संयुक्तपणे अचानक छापा टाकत प्रत्यक्ष पाहणी केली.
कारवाईत सापडलेला साठा
६५ ब्रास मुरूम
१६० ब्रास वाळू
या प्रचंड साठ्यावर प्रशासनाने तातडीने जप्तीची कारवाई केली असून, त्याची रक्कम शासनाला जमा केली जाणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे जप्त वाळू व मुरूमचा वापर शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब व गरजूंना घरकुल बांधकामासाठी हा साठा थेट मदत ठरणार आहे.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या धडक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवैध गौणखनिज साठ्यावर अशी कठोर कारवाई होणे गरजेचेच होते, तसेच संसाधनांचा योग्य व गरजूंना उपयोग होईल, याची खात्रीही यानिमित्ताने पटली आहे. ही कारवाई म्हणजे जामनेर तालुक्यातील अवैध गौणखनिजावर ठोस नियंत्रणाचे आणि गरजूंसाठी संसाधनाच्या योग्य वाटपाचे आदर्श उदाहरण ठरत आहे.
जिल्हा प्रशासनास व पोलीस यंत्रणेस या कारवाईबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.