मनवेल आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी...गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार.

मनवेल आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा साजरी...गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार.
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
मनवेल , ता. यावल  :   येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सभासद देविदास पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरूवातीला माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सभासद देविदास पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . शिक्षक राकेश महाजन यांनी गुरूपौर्णिमेविषयी माहिती देऊन गुरूंचे महत्त्व सांगितले . शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली . कार्यक्रमाचे छायाचित्रण संदीप पाटील यांनी केले .

                  कार्यक्रमाला माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , पालक मन्साराम बारेला , अधिक्षिका सरिता तडवी , ज्येष्ठ शिक्षिका उज्वला पाटील , शिक्षक सुभाष पाटील , नितीन चौधरी , कमलाकर इंगळे , विजय चव्हाण , इंद्रजित पाटील  उपस्थित होते .

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।