कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना धमकावल्यास पाच वर्षे होईल गुन्हा दाखल...

कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना धमकावल्यास पाच वर्षे होईल गुन्हा दाखल...
कायद्यातील सुधारणेला राष्ट्रपतीची मान्यता.

जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर 
सविस्तर असे की राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास, दमदाटी किंवा मारहाण केल्यास गुन्हेगारास सक्त पाच वर्षे तुरुंगात टाकण्याची तरतूद भारतीय दंड विधान आणि फौजदारी प्रक्रिया कायदयाला राष्ट्रपतीनी मान्यता दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांला मारहाण किंवा दमदाटी दिल्यास आता 
दखलपात्र आणि अजामीनपात्रनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .
महाराष्ट्र राज्य राजपत्रित  अधिकारी महासंघाच्या वतीने राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.अनेक प्रकारचे आंदोलनेही करण्यात आली.राज्य सरकारने त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा कायदा अस्तित्वात आला.त्या अनुषंगाने 
महासंघाचे नेते ग.दि.कुलथे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।