महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संघटनेच्या राज्य परिषदेसाठी जामनेर तालुक्यातून तीन प्रमुख नेत्यांची सदस्य म्हणून नियुक्ती...। तालुक्यातील भाजपा पदाधिकार्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव..
महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संघटनेच्या राज्य परिषदेसाठी जामनेर तालुक्यातून तीन प्रमुख नेत्यांची सदस्य म्हणून नियुक्ती...।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्य परिषदेवरील सदस्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली असून जामनेर तालुक्यातील तिघा प्रमुख नेत्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीत मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री. छगन शामराव झाल्टे (माजी पंचायत समिती सभापती, जामनेर) आणि श्री.गोविंद शेठ अग्रवाल (माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा जळगाव) यांचा समावेश आहे.
या नियुक्त्यांमुळे जामनेर तालुक्याचे राज्यपातळीवर नाव उज्ज्वल झाले असून पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे.या गौरवाच्या निवडीबद्दल जामनेर तालुक्याच्या वतीने तिघा नेत्यांना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व झाल्टे परिवारांकडून तसेच जामनेर तालुक्यातील जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव...।