करकी ता.मुक्ताईनगर येथील RTO विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणात प्रजाशक्ती क्रांती दलाचा कार्यकर्त्यांची तबियत बाराव्या दिवशी खालवली...।
करकी ता.मुक्ताईनगर येथील RTO विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बसलेल्या उपोषणात प्रजाशक्ती क्रांती दलाचा कार्यकर्त्यांची तबियत बाराव्या दिवशी खालवली...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर
RTO विभागातील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून दोषी आढळनाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकाने तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणी साठी प्रजाशक्ती क्रांती दलाचे कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील करकी तपासणी नाक्यावर गेल्या बारा दिवसापासून साखळी उपोषण करीत आहे. उपोषणाच्या बाराव्या दिवशी अमित तडवी ह्या कार्यकर्त्यांची तबियत उष्मलाटे मुळे खालवल्या मुळे तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले डॉक्टरांनी तातळीने उपचार करून उन्हामुळे तबियत खराब झाल्याचे सांगितले,
करकी ता. मुक्ताईनगर येथील RTO तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन चालकाची लूट होत असून त्या विरुद्धात प्रजाशक्ती क्रांती दलाने 28 मार्च पासून साखळी उपोषणास सुरवात केली आहे हे उपोषण कुठलाही खंड न करता चोवीस तास सूरु आहे उपोषण स्थळी उपोषण कर्त्यांना RTO विभागाने टेन्ट टाकण्यास नकार दिल्याने उपोषणकर्ते त्या ठिकाणी तसेच उन्हातान्हात उपोषणास बसले आहेत. ह्या मुळे उष्मलाटेचा परिणाम उपोषणकर्त्यांनाच्या तबियतीवर होत आहे, उष्मलाटे मुळे उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने व सरकार ने उपोषणाची तातळीने दखल घेऊन श्रमिकांचे शोषण करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार ने तातडीने बडतर्फ करण्याची मागणी प्रजाशक्ती क्रांती दलाचे अध्यक्ष अशोराज तायडे यांनी सरकार कडे केली आहे.