मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महसूलअधिकारी नियमपुस्तिकेचे अनावरण"

 मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महसूलअधिकारी नियमपुस्तिकेचे अनावरण"

 मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 

मुंबई -राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री राजेशकुमार, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महसूल प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी जळगाव जिल्ह्याचा अभिनव उपक्रम

 कार्यशाळेतील मुख्य आकर्षण ठरले ते — “महसूल अधिकारी नियमपुस्तिका” या नवोन्मेषी दस्तऐवजाचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण.

ही नियमपुस्तिका  विभागीय आयुक्त कोकण श्री विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद सदस्य असलेल्या समितीने तयार केली आहे.

या पुस्तिकेच्या माध्यमातून महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यातील अचूकता, एकसंधता आणि कार्यक्षमता यामध्ये भरीव मदत होणार आहे.

नियमपुस्तिका तयार करणाऱ्या टीममध्ये विशेष सहभाग:

श्री अंकुश पिनाटे – अपर जिल्हाधिकारी

श्री विजयकुमार ढगे – उपजिल्हाधिकारी (महसूल)

श्री बबन काकडे – प्रांताधिकारी, फैजपूर

श्री मनीषकुमार गायकवाड – प्रांताधिकारी, एरंडोल

श्री विजय सूर्यवंशी – तहसीलदार, कुळकायदा

श्रीमती मोहनमाला नाझीरकर – तहसीलदार, यावल

श्रीमती ज्योती गुंजाळ – तहसीलदार, महसूल

श्री विजय बनसोड – तहसीलदार, पाचोरा

श्री महेश पत्की – DIO, NIC, जळगाव
श्री मिलींद बुवा – स्वीय सहाय्यक, मा. जिल्हाधिकारी जळगाव तसेच श्री किशोर कुलकर्णी (स्वीय सहाय्यक, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे) यांचे मोलाचे सहकार्य. ही नियमपुस्तिका राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांसाठी प्रभावी मार्गदर्शक ठरणार आहे

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।