"जयभीम पदयात्रा" जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न...।डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन.।
"जयभीम पदयात्रा" जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न...।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर
जळगाव -- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने "जयभीम पदयात्रा" या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. राजेंद्र खैरनार, जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे श्री. प्रणव झा, महानगरपालिका अधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पदयात्रेत ५०० हून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थी, NCC कॅडेट्स आणि खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पदयात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाचे सामूहिक वाचन देखील यावेळी झाले.
ही पदयात्रा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. याठिकाणी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
पदयात्रेमध्ये सहभागी पदयात्रींसाठी इकरा उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री. एजाज मलिक यांच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना टोप्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री. इकबाल मिर्झा, श्री. वसीम मिर्झा, श्री. रणजीत पाटील, श्री. राहुल चौधरी, श्रीमती चंचल माळी आदी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रविंद्र नाईक यांनी केले तर श्री. नरेंद्र डागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.