छत्रपती संभाजी नगर येथील भीमगायिका पंचशीला ताई भालेराव यांचा जामनेरात कार्यक्रम संपन्न.।

छत्रपती संभाजी नगर येथील भीमगायिका पंचशीला ताई भालेराव यांचा जामनेरात कार्यक्रम संपन्न.।
जामनेर तालुक्यात भिमगीतांचा जोरदार कार्यक्रम घडवुन आणल्यामुळे
संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दादाराव वाघ यांचा सत्कार।
एकापेक्षा एक भिमगीते व गायिका पंचशीला ताई च्या आवाजात नाचून उठले भिमसैनिक।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या वतीने दि 27 वार रविवार रोजी प्रबोधनात्मक "शिवराय भीमराय गितांचा जलसा" कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता.।
याठिकाणी सर्वात प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली प्रतिमेला पुष्पहार अर्पण कर्तेवेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील,भाजपा नगरपरिषद गटनेते व वैद्यकीय आघाडी जिल्हाअध्यक्ष डॉ.प्रंशात भोंडे,भुसावल नगरसेवक जगनभाऊ लोखंडे जामनेर उपपोलिस निरिक्षक किशोर पाटील यांच्या उपस्थित पार पाडण्यात आला।तसेच पत्रकार लोकशाही चा चौथा आधार स्तंभ शांताराम झाल्टे व नितीन इंगळे गजानन तायडे यांचा सत्कार करण्यात आला।

यावेळी कार्यक्रमात
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम गायिका छत्रपती संभाजी नगर येथील पंचशीलाताई भालेराव यांच्या मधुर आवाजात भिमगीते सादर करण्यात आले।
हा ऐतिहासिक जलसा संघमित्रा बुद्ध विहार,भुसावळ रोड,येथे 
 संघमित्रा बहुउद्देशीय संस्था जामनेर चे अध्यक्ष दादाराव वाघ, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुवर, सचिव किशोर सोनवणे, खजिनदार भारत लोखंडे, सहखजिनदार संदीप डोंगरे,सुधाकर आप्पा सपकाळे भिमशक्ती महाराष्ट्र राज्य, राज जाधव ,गजानन तायडे सदस्य नितीन मोरे व दीपक शिरसाठ ,सुशील लोखंडे,प्रशिक सोनवणे ,राज वाघ,निलेश कुवर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले।

कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात परिसरातील भिमसैनिकांची उपस्थिती होती ।

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।