जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि.27रोजी प्रबोधनात्मक "शिवराय-भीमराय गितांचा जलसा"

जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि 27रोजी प्रबोधनात्मक "शिवराय भीमराय गितांचा जलसा" 
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका "भीमराज की बेटी" फेम पंचशीलाताई भालेराव।

मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर 
जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक "शिवराय-भीमराय जलसा" गितांचे आयोजन दिनांक 27/2025रोजी करण्यात येत आहे.

हा ऐतिहासिक जलसा 27 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता संघमित्रा बुद्ध विहार, भुसावळ रोड, जामनेर येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार आहे व याठिकाणी अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे.

 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका "भीमराज की बेटी" फेम पंचशीलाताई भालेराव आणि त्यांच्या संचाचे सादरीकरण. त्यांच्या सशक्त आवाजात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम प्रबोधन, संगीत आणि नृत्य यांचा संगम साधणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संघमित्रा बहुउद्देशीय संस्था जामनेर चे अध्यक्ष दादाराव वाघ, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुवर, सचिव किशोर सोनवणे, खजिनदार भारत लोखंडे, सहखजिनदार संदीप डोंगरे,सुधाकर अप्पा सपकाळे भिमशक्ती महाराष्ट्र राज्य, राज जाधव ,गजानन तायडे सदस्य नितीन मोरे व दीपक शिरसाठ ,सुशील लोखंडे,प्रशिक सोनवणे ,राज वाघ,निलेश कुवर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने जामनेर शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक,भीमसैनिक बंधू-भगिनींना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।