मुंबई येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित “जय भीम पदयात्रा” मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी...।

मुंबई येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित “जय भीम पदयात्रा” मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी...।

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्याने युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने मुंबई येथे “जय भीम पदयात्रा”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदयात्रेत सहभागी होत नरिमन पॉईंट ते बाबासाहेबांच्या पुतळ्या पर्यंत बाबासाहेबांच्या नावाचा गजर करत पदयात्रेची समाप्ती झाली.

“जय भीम पदयात्रा”ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना समर्पित या ऐतिहासिक पदयात्रेचा भाग असणे ही अभिमानाची भावना आहे. हा प्रयत्न तरुणांना संविधानाच्या मूलभूत मूल्यांशी — न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता — जोडण्याचे एक साधन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. त्यांचे आदर्श स्वीकारून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची यावेळी उपस्थित तरुणांसह प्रतिज्ञा केली.

यावेळी कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री श्री.मंगलप्रभात लोढा जी, माजी खासदार श्री.अमर साबळेजी, माजी मंत्री तथा आमदार श्री.राजकुमारजी बडोले जी, तसेच माय भारत, नेहरू युवा केंद्र व एनएसएस स्वयंसेवक व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।