भारतातील ईस्पोर्ट्स परिसंस्थेच्या विकासासाठी सर्व धारकांनी एकत्र येऊन विविध विचारमंथन करणे आवश्यक -केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे...।

भारतातील ईस्पोर्ट्स परिसंस्थेच्या विकासासाठी सर्व धारकांनी एकत्र येऊन विविध विचारमंथन करणे आवश्यक -केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे...।

दिनांक : १ एप्रिल २०२५
स्थळ  : नवी दिल्ली
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर 
आज केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI)यांच्या तर्फे आणि क्राफ्टन व इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित “ईस्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५”- Esports Conclave 2025मध्ये सहभाग घेतला. भारताला जागतिक ईस्पोर्ट्स उद्योगात अग्रस्थानी नेण्यासाठी धोरणात्मक चर्चा, गुंतवणूक आणि संधी यावर भर देण्यासाठी हा ईस्पोर्ट्स कॉन्क्लेव २०२५ एक महत्त्वाचा मंच ठरत आहे. या परिषदेत ईस्पोर्ट्सच्या भविष्यातील संधी आणि जागतिक नेतृत्वातील भूमिकेवर चर्चा करण्यात आली.

या संवादादरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ईस्पोर्ट्सच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता वाढवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यासारख्या बाबींवर भर दिला आणि ईस्पोर्ट्स ला मुख्य प्रवाहातील क्रीडा प्रकार बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी ईस्पोर्ट्स क्षेत्रातील प्रतिभा आणि नविन उपक्रम वाढवण्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या ईस्पोर्ट्स संबंधित सर्व भागधारकांचे आभार मानले. तसेच ईस्पोर्ट्सच्या संपूर्ण विकासासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्रामधील सहकार्य महत्त्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

ई-स्पोर्ट्स मधील पदक विजेत्यांना रोख प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास पात्र ठरवण्याचा निर्णय केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांनी घेतला आहे. 2022 पर्यंत भारतातील ईस्पोर्ट्स खेळाडूंची संख्या सुमारे 6 लाख इतकी नोंदवली गेली होती. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 300 टक्क्यांनी वाढली होती. या वाढीच्या मार्गावर पुढे जात, पुढील पाच वर्षांत हा आकडा 10 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

याला ऐतिहासिक पाऊल मानून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सरकार ई-स्पोर्ट्सच्या वाढीसाठी आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. या परिषदेत क्राफ्टन इंडिया चे CEO श्री. सीन ह्युनिल सोन आणि अन्य प्रमुख उद्योगतज्ज्ञांनी ई-स्पोर्ट्सच्या झपाट्याने होत असलेल्या वाढी आणि अर्थव्यवस्थेवरील परिणामांवर विचारमंथन केले.

या प्रसंगी सन्माननीय केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह इन्व्हेस्ट इंडिया चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अमूल्य साह, उत्तर प्रदेश ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री. आनंदेश्वर पांडे, PEFI चे राष्ट्रीय सचिव श्री. पीयूष जैन, तसेच अनेक अधिकारी आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।