" देश आम्हाला जीवन देतो, त्यामुळे आम्हीपण देशाचे देणे लागतो " लॉर्ड गणेशा शाळा जामनेर येथे श्री. वेद जी यांचे प्रतिपादन...।
" देश आम्हाला जीवन देतो, त्यामुळे आम्हीपण देशाचे देणे लागतो " लॉर्ड गणेशा शाळा जामनेर येथे श्री. वेद जी यांचे प्रतिपादन...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर
लॉर्ड गणेशा शाळा, जामनेर व सूर्या फौडेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे सूर्या फौंडेशन, नवी दिल्ली शिबीर प्रमुख श्री. वेद जी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
ज्या देशात आम्ही रहातो, जो देश आमच्या पिढ्या घडवतो, त्या देशाचे आम्ही पण देणे लागतो, या उदात्त भावनेने विदयार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासोबत देशभक्ती देखील जोपासावी असा मोलाचा संदेश श्री. वेद जी यांनी दिला.
"ज्या देशाचा तरुण सुदृढ व शिक्षित असतो तो देश सर्वात बलवान असतो" या स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने प्रेरित होवून पद्मश्री. श्री. जयप्रकाश अग्रवाल यांनी सूर्या फौडेशन ची स्थापना केली. स्वताची भरपूर जमीन असून सुद्धा पारंपारिक शेती पीक न घेता, त्यांनी तरुणांचे पिक घेण्याचे ठरविले.
संपूर्ण भारत देश बलवान करण्याच्या या महान कार्यात खारीचा वाटा म्हणून गेल्या ५ वर्षात उत्तर महाराष्ट्रात प्रथमच लॉर्ड गणेशा शाळा जामनेर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिरासाठी नासिक, शिंदखेडा, छ. संभाजीनगर व जामनेर येथील इ. ६ वी ते इ. १० च्या एकूण ९४ भैया व ३२ दिदी यांनी सहभाग घेतलेला असून त्यांना सूर्या फौंडेशन, नवी दिल्ली येथील १५ प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत.
विद्यार्थ्यांनी शिबिरात जास्तीत जास्त नाविन्यता शिकून मोबाईल च्या व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन शाळा सचिव श्री. अभय बोहरा यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर श्री. वेद जी श्री. हेमंत लालवाणी श्री. दीपक पाटील, श्री. राहुल साबद्रा, श्री. विनोद बुले, श्री. अभय सांखला, श्री. सतीश मोरे, श्री. धनंजय सिंग व श्री. गणेश पालवे उपस्थित होते.
शिबिरासाठी विद्यार्थ्यांना सोडतांना पालकांमध्ये उत्सुकता व हुरहूर दिसून आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. हिमांशू भैया तर आभार प्रदर्शन शिबीर प्रमुख श्री. दत्ता देसले यांनी केले.