पहूर येथील पत्रकार गीता भामेरे यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे शहीद भगतसिंग योद्धा पुरस्काराने सन्मानित...।

पहूर येथील पत्रकार गीता भामेरे यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे शहीद भगतसिंग योद्धा पुरस्काराने सन्मानित...।
महिला दिनानिमित्त गौरव !
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर 

पहूर , ता . जामनेर ( ता . ९ )
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पहूर  शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा ज्ञानवेद प्रबोधिनीच्या संस्थापक संचालिका पत्रकार सौ . गीता शंकर भामेरे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात  राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड . राणी स्वामी यांच्या हस्ते शहीद भगतसिंग  योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला .
         पारोळा तालुक्यातील आदर्श गाव  राजवड येथील शबरी फार्म मध्ये दि .८  व ९ मार्च रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले . यात  पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केलेल्या सौ . गीता भामेरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले . त्यांच्या या यशाबद्दल   विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत ,   द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी , भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका उपाध्यक्ष ईश्वर हिवाळे , शहराध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज आदींनी अभिनंदन केले आहे .

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।