गलंगी तालुका चोपडा जि .प. शाळा गलंगी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा संपन्न...।

गलंगी तालुका चोपडा 
जि .प. शाळा गलंगी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा संपन्न...।
मुलीच्या पहिलाच वाढदिवस असल्याने शालेय साहित्य वाटप करून केला साजरा. 

मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर 
गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग 
गलंगी येथील जिल्हा परिषद शाळा गलंगी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा घेण्यात आला. व योगेश बाविस्कर सुपर शॉप चे मालक यांना कन्यारत्न असल्यामुळे पहिला वाढदिवस थाटामाटात न साजरा करता यांनी गलंगी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या मुलांना व मुलींना वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करून लहान लहान बालकांचे चेहऱ्यावरती हास्य पाहून साजरा केला. कू .उ. बा. समिती चोपडा संचालक किरण देवराज सरपंच शितल देवराज पोलीस पाटील चारुलता देवराज शालेय समितीचे अध्यक्ष रेखा कोळी व ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक पूनम पवार व सूत्रसंचालन सचिन पाटील व रवींद्र ठाकरे सर यांनी महिला समीकरणाबाबत माहिती दिली व शिक्षिका नूतन रायसिंग यांनी समारोप करून आलेल्या महिला मंडळ व पदाधिकारी यांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली.।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।