जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ...।
तूर खरेदी केंद्रावेळी मंत्री गिरिश भाऊ महाजन सह भाजपा पदाधिकारी।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर
जामनेर – शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आला. या खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या तुरीला योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास शेतकरी सहकारी संघाच्या सर्व संचालकांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत, सरकारच्या कृषी धोरणांबाबत माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांनी तूर खरेदी प्रक्रियेसाठी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत किंमतीत तूर विक्री करण्यासाठी या केंद्राचा फायदा होणार असून, जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.