माता बहिणींच्या कुंकवाचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा - डॉ.प्रशांत ठाकरे महाराज..।

माता बहिणींच्या कुंकवाचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा - डॉ.प्रशांत ठाकरे महाराज..।
संस्कृती रक्षणाची दिली हाक !

लेले नगर हनुमान मंदिर किर्तन सप्ताहात  भक्तीसागरात न्हाले भाविक
आज सांगता ;महाप्रसादाचे आयोजन

मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर 
पहूर , ता . जामनेर , जि . जळगाव ( ता . २६ ) आया - बहिणींच्या कुंकवाचे रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शंभुराजे आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे , असे प्रतिपादन ख्यातनाम कीर्तनकार ह भ प डॉ .प्रशांत ठाकरे महाराज (अकोला ) यांनी केले . जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे पुण्य भूमी लेले नगर येथील हनुमान मंदिरात आयोजित रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताहात सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते .
         पुढे बोलताना डॉ .  प्रशांत ठाकरे महाराज म्हणाले की , बलवंत शरीर घडवायचे असेल तर निर्व्यसनी राहायला हवं , शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक आरोग्य ही टिकून राहणे गरजेचे आहे . मानसिक स्वास्थ्यासाठी शुर - वीरांची , साधू संतांची , क्रांतीकारकांची चरित्रं वाचली पाहिजेत .
        याप्रसंगी किर्तन देणगी दाते रामदास जाधव , राजू जाधव , रवींद्र गोरे अन्नदाते आनंदा उबाळे , श्रावण जाधव यांचा महाराजांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
सूत्रसंचालन ह भ प मुकुंदा महाराज यांनी केले .
     मृदंगाचार्य अवधूत महाराज , गायनाचार्य मुरलीधर महाराज , कल्पेश महाराज , बाबुराव महाराज , ज्ञानेश्वर महाराज , ज्ञानेश्वर महाराज , प्रकाश महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती .श्री.क्षेत्र हनुमान मंदिर  ट्रस्टचे पदाधिकारी , ग्रामस्थ , भजनी मंडळ , महिला मंडळ , तरूण कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे .

भागवत कथेचा समारोप
ह भ प दत्तात्रय महाराज देवळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांनी संगीतमय भागवत कथेचा लाभ घेतला .दुपारी भागवत कथेचा समारोप करण्यात आला . 

महाप्रसादाचे आयोजन

रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताहाच्या सांगता समारोह निमित्त गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . सायंकाळी पालखी सोहळा होणार असून रात्री हभप राजेंद्र महाराज (केकत निंभोरा ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे .

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।