जळगाव येथे भुजबळ समर्थकांची महामेळाव्याची बैठक संपन्न...।

जळगाव येथे भुजबळ समर्थकांची महामेळाव्याची  बैठक संपन्न...।
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवहान.।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 

जळगाव: -- येथे आज रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनात ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, ह्या महाएल्गार  मेळाव्यात ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अहवान माळी समाज सुधारणा मंडळ तर्फे करण्यात आले.क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातची बैठक आज दिनांक ११ मार्च रोजी जळगाव येथे संपन्न झाले. यावेळी माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ए के गंभीर सर, उपाध्यक्ष सुरेश  भिला महाजन, सचिव किशोर राजकुळे सर, पी जी चौधरी सर, चित्राताई कैलास माळी, नरेश लक्ष्मण महाजन, दगडू भगवान महाजन, सुरेश संतोष महाजन , भास्कर सुकदेव महाजन ,हिरामण महाजन, शिवाजी महाजन, गिरीश चौधरी, दीपक महाजन सर, कैलास शामराव महाजन, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।