चिंचखेडा बु येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री सुरु; पत्रकाराची मानहानी केल्याचा आरोप.।

चिंचखेडा बु येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री सुरु; पत्रकाराची मानहानी केल्याचा आरोप.।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
जळगाव जिल्हा
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बु येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर देशी दारू विक्री सुरु असल्याची तक्रार पत्रकार प्रीती हरेश्वर कुमावत यांनी पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन, यांच्याकडे केली आहे. स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अवैध दारू विक्रीस अधिक प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप कुमावत यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
•  माहितीच्या हक्काचा वापर केल्याचा राग? पत्रकार महिलेला खोट्या आरोपात अडकविण्याचा

पत्रकार प्रीती कुमावत यांनी दिनांक २३ मे २०२४ रोजी चिंचखेडा नवीन गावठाण १ येथील ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकार अंतर्गत विकासकामांबाबत माहिती मागवली होती. या घटनेनंतर, सरपंच ज्योती रमेश पारधी यांचे पती रमेश पारधी आणि उपसरपंच अनिता गोपाल बोरसे यांचे पती गोपाल बोरसे यांनी त्यांना धमकावले व खोटे आरोप करत त्यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायत कार्यकारिणीने कुमावत यांच्यावर गावात दारू विक्री करत असल्याचा खोटा आरोप केला होता. त्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्या वेळी असलेले पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांची एनसीआर दाखल करून त्यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. कुमावत यांनी सांगितले की, ‘मी पत्रकार असूनदेखील मला न्याय मिळत नाही. जर महिलांना न्याय मिळत नसेल तर न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.’
कुमावत यांनी पोलीस प्रशासनाकडे केलेल्या मागण्या : १. त्यांच्या विरोधात खोटे आरोप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांवर मानहानीचा गुन्हा दाखल करावा. २. जामनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची चौकशी करून त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे ठरवण्यात यावेत. ३. चिंचखेडा बु येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार.? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।